'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीचं नेमकं वय किती आहे माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 11:06 IST2024-03-18T10:52:04+5:302024-03-18T11:06:14+5:30
उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.

'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीचं नेमकं वय किती आहे माहितीये का?
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग(Tharala Tar Mag)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत सायलीची भूमिका अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने साकारली आहे. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकतंच तिचे खरे वय किती याचा खुलासा झाला आहे.
जुई हेल्दी आणि फिट राहते. त्यामुळे तिच्या वयाचा अंदाज येत नाही. जुई नेहमी २० -२२ वर्षाच्या तरूणींसारखी क्लासी दिसते. त्यामुळे तिचे नेमके वय किती, यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. जुईचं खरं वय हे गुगलवर दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्ष आहे. तिला बघून कुणालाही तिच्या वयाचा अंदाज येणार नाही. जुईचा जन्म ८ जुलै १९८८ रोजी झाला आहे. जुई आता ३५ वर्षांची आहे. तर येत्या ८ जुलैला ती ३६ वर्षांची होईल. मात्र, जुईकडे पाहून तिच्या वयाचा मुळीच अंदाज येत नसल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
जुईची 'ठरलं तर मग' ही मालिका सध्या टीआरपीमध्ये टॉपमध्ये आहे. जुई ही पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती पुढचं पाऊल मालिकेत जुईनं साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना आवडली. आजही या पात्राची प्रेक्षक आठवण काढत असतात. पुढचं पाऊल नंतर सरस्वती, वर्तुळ, बिग बॉस मराठी आणि आता ठरलं तर मग या मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कर्जतच्या या लेकीने कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.