प्रिया मराठेचं टोपणनाव माहितीये का? शंतनूने प्रेमाने दिलंय बायकोला 'हे' नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 16:37 IST2023-12-11T16:36:10+5:302023-12-11T16:37:04+5:30
Priya Marathe: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं.

प्रिया मराठेचं टोपणनाव माहितीये का? शंतनूने प्रेमाने दिलंय बायकोला 'हे' नाव
मराठी कलाविश्वातील मोस्ट लव्हेबल कपल म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे ( Priya Marathe) आणि शंतनू मोघे (shantanu moghe). या दोघांनीही त्यांच्या अभिनयशैलीच्या जोरावर मराठीसह हिंदी मालिका विश्वामध्ये हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज त्यांची लोकप्रियताही तितकीच जास्त असल्याचं पाहायला मिळतं. ही जोडी सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांच्यातील प्रेम बऱ्याचदा नेटकऱ्यांना पाहायला मिळतं.
अलिकडेच प्रियाने लोकमत फिल्मीच्या do you have a minutes या सेगमेंटमध्ये तिच्याशी निगडीत काही गोष्टींचा उलगडा केला. यात शंतनू तिला कोणत्या टोपणनावाने हाक मारतो हे सुद्धा तिने सांगितलं.
'शंतनू तुला प्रेमाने कोणत्या नावाने हाक मारतो?' असा प्रश्न प्रियाला विचारण्यात आला. त्यावर, 'तो मला जाना म्हणतो', असं उत्तरं प्रियाने दिलं. प्रिया आणि शंतनू यांचं लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्री आणि मग पुढे प्रेमाचा प्रवास सुरु झाला.
दरम्यान, शंतनूने स्वराज्यरक्षक संभाजी’, आई कुठे काय करते यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, प्रियाने पवित्र रिश्ता, कसम से, बडे अच्छे लगते हैं, साथ निभाना साथिया या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर या सुखांनो या, चार दिवस सासूचे, तू तिथे मी यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे.