वडिलांच्या कडेवर असलेल्या या क्युट मुलीला ओळखलंत का ? आज गाजवतेय छोटा पडदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:27 IST2023-10-17T16:12:26+5:302023-10-17T16:27:47+5:30
सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात.

वडिलांच्या कडेवर असलेल्या या क्युट मुलीला ओळखलंत का ? आज गाजवतेय छोटा पडदा
बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. मराठी टीव्ही जगतातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे.
फोटोत बाबांच्या कडेवर असलेली ही क्युट अभिनेत्री आज मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून अरुंधतीची मुलगी ईशा आहे अर्थात अभिनेत्री अपूर्वा गोरे. 'आई कुठे काय करते' मालिकेत अपूर्वा अरुंधतीची मुलगी ईशाची भूमिका साकारते आहे. अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकेत साधी सरळ ईशा अर्थातच अपूर्वा रिअल लाईफमध्ये फारच ग्लॅमरस आहे. ति तिची फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकवेळा तिच्या डान्सच्या व्हिडीओमुळे ही अपूर्वा चर्चेत असते.
सोशल मीडियावर अपूवार्चा चाहता वर्ग मोठा असून तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात. अपूर्वाने हिंदी मालिकेतसुद्धा काम केलं आहे. ती नुकतीच ‘वागळे की दुनिया’या प्रसिद्ध हिंदी मालिकेत झळकली आहे.