'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 19:02 IST2023-12-21T19:01:21+5:302023-12-21T19:02:59+5:30
Milind gawali: अलिकडेच या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट
छोट्या पडद्यावर तुफान गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). आतापर्यंत या मालिकेत अरुंधती आणि देशमुख कुटुंबीय यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. परंतु, या सगळ्या संकटांना या कुटुंबाने परतवून लावलं आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक ठरत आहे. या मालिकेतील कलाकार आणि कथानक जितकं चर्चेत असतं तितकीच चर्चा त्यांच्या समृद्धी या बंगल्याची होत असते.
समृद्धी या बंगल्यात देशमुख कुटुंबीय रहात असून हा बंगला एका मोठ्या विस्तीर्ण अशा जागेत बांधला आहे. आजूबाजूला झाडं, छान बाग असा त्याच्या आसपासचा परिसर आहे. त्यामुळे हा बंगला नेमका कुठे आहे किंवा या मालिकेचं शूटिंग नेमकं कुठे पार पडतंय असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच हा बंगला नेमका कुठे आहे हे अभिनेता मिलिंद गवळी यांच्या एका पोस्टमधून नुकतंच समोर आलं आहे.
अलिकडेच या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा मालिकेतील प्रवास कसा सुरु झाला हे सांगितलं. हे सांगत असतानाच या मालिकेचं शूटिंग नेमकं कुठे सुरु आहे याचाही खुलासा त्यांच्या पोस्टमधून झाला.
'आई कुठे काय करते' या मालिकेचं चित्रीकरण ठाण्यात सुरु आहे. ठाण्यातील ओवळ्याजवळ पानखंडा या गावात या मालिकेचं शूट सुरु आहे. विशेष म्हणजे समृद्धी असं नाव दिलेला हा बंगला पालेकर यांचा आहे. या बंगल्याच्या आजूबाजुला हिरवीगार झाडी असून घोडबंदर रोडला लागून ही जागा आहे.
दरम्यान, २०१९ पासून या ठिकाणी आई कुठे काय करते या मालिकेचं शुटिंग सुरु आहे. या मालिकेत मिलिंद गवळी, मधुराणी गोखले-प्रभुलकर, रुपाली भोसले, अर्चना पाटकर ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकत आहेत.