फोटोत आई-बाबांसोबत पोझ देणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे प्रसिद्ध चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 08:00 AM2023-10-12T08:00:00+5:302023-10-12T08:00:01+5:30

सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Do you recognize this cute little girl who is posing with her parents? She is a famous face on Marathi television | फोटोत आई-बाबांसोबत पोझ देणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे प्रसिद्ध चेहरा

फोटोत आई-बाबांसोबत पोझ देणाऱ्या 'या' क्युट चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे प्रसिद्ध चेहरा

 बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. मराठी टीव्ही जगतातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे.

हा फोटो पाहून ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ठिपक्यांची रांगोळीमध्ये अप्पूची भूमिका साकारणारी  ज्ञानदा रामतीर्थकर आहे. 

ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठीचा लोकप्रिय चेहरा आहे. हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. ज्ञानदा ही मूळची सांगली जिल्ह्यातील विटा शहरातली आहे. पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना ज्ञानदाचे रंगभूमीवर पदार्पण झाले. अभिनयाची आवड जोपासत असताना कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सख्या रे’ या मालिकेतून तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली.

जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे, शादी मुबारक या मराठी आणि हिंदी मालिकेत ज्ञानदा  झळकली. तू इथे जवळी रहा, प्रेमाची आरती या गाण्यातूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती.‘धुरळा’ या गाजलेल्या चित्रपटातही ज्ञानदा महत्वाची भूमिका साकारताना दिसली. ‘दोस्ती दिल धोका’ हा तेलगू चित्रपटही तिने भूमिका साकारली आहे. 

Web Title: Do you recognize this cute little girl who is posing with her parents? She is a famous face on Marathi television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.