‘करिश्मा का करिश्मा’ मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीला ओळखता?, १९ वर्षांनंतर ओळखणं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:01 PM2019-06-19T15:01:52+5:302019-06-19T15:05:01+5:30
.आपल्या आई वडिलांचा वारसा चालवत अभिनयाच्या दुनियेत त्यांच्या मुलांनी कमाल केल्याची अनेक उदाहरणं आहेत.मात्र बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झनक अचानक पडद्यापासून दूर गेली.
का करिश्मा’ आणि 'सोनपरी' या मालिकेतील तिचा अभिनय रसिकांना भावला. ९०च्या दशकात बालकलाकार म्हणून ती प्रसिद्धीच्या शिखरावर होती. ती बालकलाकार म्हणजे झनक शुक्ला. ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत झनकने रोबोटची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका बच्चेकंपनीसह तमाम रसिकांना भावली होती. तसेच झनक शाहरूख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान स्टारर 'कल हो ना हो' या सिनेमातही झळकली होती.आपल्या आई वडिलांचा वारसा चालवत अभिनयाच्या दुनियेत त्यांच्या मुलांनी कमाल केल्याची अनेक उदाहरणं आहेत.मात्र बालपणीच आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी झनक अचानक पडद्यापासून दूर गेली.
सोनपरी मालिकेनंतर रसिकांना तिचं दर्शन झालं नाही. अभिनयाच्या क्षेत्रात परतण्याचा झनकचा तूर्तास तरी कोणताही इरादा नाही. सध्या ती तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. तसेच ती सतत सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्रामवर झनकचे बरेच फोटो असून त्यात तिला ओळखणं कठीण आहे.ती आपला बराच वेळ मित्र मैत्रिणींसह घालवते.
भविष्यात झनकला सामाजिक कार्य करायची इच्छा आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 23.4k इतके फॉलोअर्स आहेत. तिला फिरण्याचीही खूप आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत ती तेथील संस्कृती जाणून घेत तिथले खास गोष्टी कॅम-यात कैद करत असते.
विशेष झनकची आई टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. सुप्रिया शुक्ला असे तिच्या आईचे नाव आहे. त्यामुळे बालपणापासून अभिनयाचे बाळकडू झनकला आईकडूनच मिळाले. सुप्रिया शुक्ला कुमकुम भाग्य मालिकेत आणि मै हुँ हिरो तेरा सिनेमातही झळकल्या आहेत.