'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधील शलाका आठवतेय का? कलाविश्वातून आहे गायब, तिला करायचंय कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:36 IST2025-01-04T12:35:02+5:302025-01-04T12:36:26+5:30
Shriyut Gangadhar Tipre : २००१ साली श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील बरेच कलाकार इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र टिपरेंची नात शलाका कलाविश्वातून गायब आहे.

'श्रीयुत गंगाधर टिपरे'मधील शलाका आठवतेय का? कलाविश्वातून आहे गायब, तिला करायचंय कमबॅक
२००१ साली श्रीयुत गंगाधर टिपरे (Shriyut Gangadhar Tipre) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. यातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यात शलाका टिपरे ही भूमिका विशेष गाजली. ही भूमिका अभिनेत्री रेश्मा नाईक (Reshma Naik) हिने साकारली होती. या मालिकेतील बरेच कलाकार इंडस्ट्रीत सक्रीय आहे. मात्र टिपरेंची नात शलाका कलाविश्वातून गायब आहे.
अभिनेत्री रेश्मा नाईक हिला श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली. रेश्मा सध्या सिनेइंडस्ट्रीत सक्रीय नाही आणि ती कुटुंबात रमली आहे. तिने एका मुलाखतीत या मालिकेची आठवण सांगताना म्हणाली होती की, २५ मुली रिजेक्ट केल्यानंतर माझी निवड झाली". रेश्माला पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात येण्याची उत्सुकता आहे. नुपूर या मालिकेत तिची छोटीशी भूमिका होती त्यावेळी केदार शिंदेने तिला पाहिले होते. श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेत शलाकाच्या भूमिकेसाठी त्यांनी अगोदर २५ मुलींना रिजेक्ट केले होते.
आज श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेला प्रदर्शित होऊन जवळपास २३ वर्ष लोटली आहेत. या आठवणींबद्दल रेश्मा नाईक म्हणते की, "मी २६ वी मुलगी होते जेव्हा श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेसाठी माझी निवड करण्यात आली. अगोदरच्या २५ मुलींना केदारने रिजेक्ट केले होते. या भूमिकेने मला मोठी लोकप्रियता मिळवून दिली अगदी आजही कधी बाहेर गेल्यानंतर 'तू शलाका ना?' अशी ओळख दिली जाते. ही मालिका चालू होती तेव्हाच मी अमेरिकेला जाणार होते. काही दिवसांसाठी पुन्हा परतल्यानंतर मी मालिकेचे शेवटचे १० एपिसोड्स शूट केले. पण आता मी इथेच राहते.
रेश्माला करायचंय सिनेइंडस्ट्रीत कमबॅक
मुलगा लहान होता तेव्हा सिंगल पॅरेंट म्हणून मला त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. मी आर्टिस्ट सुद्धा आहे. मधल्या काळात काही इव्हेंट केले, मुलांना गणपती बनवायचे शिकवले. आता मुलगा मोठा झालाय, त्यालाही या क्षेत्राची आवड आहे. अनिमेशनमध्ये त्याला काही करायचं आहे. मी ही या क्षेत्रात पुन्हा यायला उत्सुक आहे. केदारला मी सतत याबद्दल विचारत असते. भविष्यात माझी ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असे रेश्मा नाईक सांगते.