'आनंदी गोपाल' मालिकेतील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 16:37 IST2024-05-21T16:36:52+5:302024-05-21T16:37:12+5:30
९०च्या दशकात बनलेल्या दूरदर्शनवरील अनेक मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'आनंदी गोपाल' (Anandi Gopal).

'आनंदी गोपाल' मालिकेतील ही चिमुरडी आठवतेय का?, आता दिसते अशी
९०च्या दशकात बनलेल्या दूरदर्शनवरील अनेक मालिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या आहेत. त्यातील एक मालिका म्हणजे 'आनंदी गोपाल' (Anandi Gopal). देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ यांच्या जीवनावर भाष्य करणारी ‘आनंदी गोपाल’ ही मालिका त्याकाळी खूप गाजली होती. या मालिकेत मुख्य भूमिकेत अजित भुरे होते तर भार्गवी चिरमुले हिने तरुणपणीची आनंदीबाई साकारली होती. मालिकेत बालपणीची यमुना जोशी म्हणजेच आनंदीची भूमिका बालकलाकार राजश्री जोशी (Rajashree Joshi) हिने बजावली होती.
यमुना जोशीने आनंदीची अतिशय सुंदर भूमिका साकारली होती. मालिकेमुळे राजश्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. नया नुक्कड या आणखी एका मालिकेत तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. तिचे बालपण मुंबईतच गेले. दादरमधील छबिलदास आणि किंग जॉर्ज या शाळेतून तिने शिक्षण घेतले आहे. पुढे तिने मुंबई युनिव्हर्सिटीमधून पदवीचे शिक्षण घेतले. राजश्रीची बहीण धनश्री जोशी ही देखील अभिनेत्री आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही तिने काम केले आहे. याशिवाय कल्याणमधील प्रसिद्ध ‘जोशी बाग’ची ती मालक आहे. इथे वेगवेगळे इव्हेंट आयोजित करण्यात येतात. तसेच श्वानांसाठी पार्क म्हणून जोशी बाग डॉग पार्क ही कन्सेप्ट देखील त्यांनी सुरू केली आहे.
राजश्री अभिनयापासून दुरावली आहे. तिने १३ डिसेंबर २००८ रोजी केदार निमकर यांच्यासोबत लग्न केले. Audiogyan या पॉडकास्टवर जगभरातील अनेक क्रिएटिव्ह मान्यवरांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या आहेत.