सई ताम्हणकर अन् आविष्कार दारव्हेकरची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती गाजलेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 15:50 IST2024-04-21T15:49:44+5:302024-04-21T15:50:32+5:30
Tv serial: छोट्या पडद्यावर ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारही झळकले होते.

सई ताम्हणकर अन् आविष्कार दारव्हेकरची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती गाजलेली
'वादळवाट', 'अवघाचि हा संसार', 'आभाळमाया' यांसारख्या अनेक मालिका मराठी कलाविश्वात तुफान गाजल्या. या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेऊन बरीच वर्ष झाली आहेत. मात्र, त्याची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षक या मालिकांच्या आठवणींमध्ये रमतात. सध्या सोशल मीडियावर झी मराठीवरील एका लोकप्रिय मालिकेतील फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यावर अनेकांना त्या मालिकेचं नाव लक्षात आलं आहे. तर, काही जण ही मालिका कोणती असावी याचा विचार करत आहेत.
TRP या इन्स्टाग्राम पेजवर अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो एका जुन्या गाजललेल्या मालिकेतील असून ही मालिका ओळखलीत का? असा प्रश्न त्यांनी कॅप्शनमध्ये विचारला आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो या गोजिरवाण्या घरात या गाजलेल्या मालिकेतील आहे. या मालिकेत सईने मधुरा ही भूमिका साकारली होती. तर, अविष्कारने शेखर ही भूमिका वठवली होती. या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी बरीच लोकप्रिय झाली होती.
दरम्यान, ही मालिका छोट्या पडद्यावर तुफान गाजली होती. या मालिकेत सई आणि अविष्कार व्यक्तिरिक्त उज्वला जोग, प्रदिप वेलणकर, गिरीश ओक, स्वाती चिटणीस, संतोष जुवेकर, आनंद अभ्यंकर, सुशांत शेलार यांसारखे कलाकार झळकले होते.