'माझी तुझी रेशीमगाठ' फेम संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीला पाहिलंत का?, होतंय तिचं सर्वत्र कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 07:00 AM2022-03-23T07:00:00+5:302022-03-23T07:00:00+5:30

Sankarshan Karhade:संकर्षण कऱ्हाडेची पत्नी सध्या चर्चेत आली आहे.

Do you see 'Mazi Tuzi Reshimgath' fame Sankarshan Karhade's Wife? | 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीला पाहिलंत का?, होतंय तिचं सर्वत्र कौतुक

'माझी तुझी रेशीमगाठ' फेम संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीला पाहिलंत का?, होतंय तिचं सर्वत्र कौतुक

googlenewsNext

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेतून घराघरात पोहोचला आहे. संकर्षण याने अनेक मालिका आणि टीव्ही शोरूम मधून असल्या अभिनयाची छाप सोडली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेसह तो किच्चन कल्लाकार या शोमधून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.  

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये संकर्षण समीरच्या भूमिकेत दिसत आहे. समीर हा यशचा मित्र असतो आणि त्याला प्रत्येक बाबतीमध्ये मदत करत असतो. त्याचप्रमाणे नेहा हिला देखील तो मदत करताना आपण पाहिले आहे. संकर्षण कऱ्हाडे हा मूळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याचा रहिवासी आहे.

संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर सक्रीय असून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतो. काही दिवसांपूर्वी संकर्षण याचे नाटक देखील लोकप्रिय झाले आहे. ‘तू म्हणशील तसं’ या नाटकामध्ये तो अतिशय जबरदस्त असे काम करताना आपल्याला दिसत आहे.

आता संकर्षणच्या पत्नीबाबतचे एक वृत्त सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. संकर्षणच्या पत्नीचे नाव शलाका पांडे असे आहे. शलाका आणि संकर्षण सोशल मीडियावर आपले अनेक फोटो शेअर करत असतात. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच दोन गोंडस मुलांना जन्म दिला आहे. संकर्षणची पत्नी शलाका पांडे ही देखील एक कलाकार आहे. वास्तविक जीवनात ती पेंटर असून आपले अनेक पेंटिंग ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे तिचे कौतुक देखील अनेक जण करताना दिसत असतात.

Web Title: Do you see 'Mazi Tuzi Reshimgath' fame Sankarshan Karhade's Wife?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.