कोरोना रुग्णांसाठी देवदूत बनलेला डॉक्टर- अभिनेता आशिष गोखलेचे छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 07:28 PM2021-12-10T19:28:36+5:302021-12-10T19:29:24+5:30

Ashish Gokhale : मोठ्या ब्रेकनंतर आशिख गोखले पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

Doctor-actor Ashish Gokhale's comeback on the small screen | कोरोना रुग्णांसाठी देवदूत बनलेला डॉक्टर- अभिनेता आशिष गोखलेचे छोट्या पडद्यावर कमबॅक

कोरोना रुग्णांसाठी देवदूत बनलेला डॉक्टर- अभिनेता आशिष गोखलेचे छोट्या पडद्यावर कमबॅक

googlenewsNext

डॉ. आशिष गोखले हे नाव मराठी आणि हिंदी टीव्ही मालिका तसेच, चित्रपटांमधून पुढे आले असून हा अभिनेता प्रशिक्षित डॉक्टरही आहे, तो जुहू येथील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करतो. डॉक्टरी पेशासोबतच आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी अभिनेता - डॉक्टर आशिष गोखले (Dr. Ashish Gokhale)आला पुन्हा एकदा अबोली या मराठी मालिकेच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. संदीप सिखंद यांची निर्मिती असलेली ही मराठी मालिका सध्या सोल प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली तयार केली जात आहे.

मोठ्या ब्रेकनंतर आशिख गोखले पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या या दणदणीत कमबॅकबद्दल बोलताना आशिष सांगतो, "अबोली मालिकेचा महत्वाचा भाग होण्याचा मला फार आनंद होतो आहे. मी खूप एक्सायटेड असून विश्वास हे पात्र मी या मालिकेत साकारणार आहे. माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध, रागीट स्वभावाच्या या विश्वासवर माझे चाहते नक्की प्रेम करतील. अबोलीमध्ये मी साकारत असलेले पात्र आत्मकेंद्री, लाजाळू आणि अत्यंत रागीट पुरूषाचे असून हा स्वभाव माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे.

'कंट्रोल आशिष कंट्रोल...'

त्याने पुढे सांगितले की, हे पात्र उत्तम प्रकारे वठवता यावे यासाठी विश्वास जगेल तसे आयुष्य मी जगायला सुरूवात केली. यासाठी प्रयत्न करताना मी माझ्या भावना दाबून ठेवायला लागलो, कमी बोलायला लागलो, फारच गंभीर दिसण्याचा प्रयत्न केला. मी खूप बडबडा, विनोदी, आनंदी आणि उत्साही माणूस असल्यामुळे हे असे प्रयत्न माझ्यासाठी आव्हान ठरले. रुग्णालयातही अनेकांनी माझ्यातले हे बदल पाहिले आणि मला नेमके काय झाले आहे याचे आश्चर्यही त्यांनी व्यक्त केले. मी जेव्हा एकटा असायचो, तेव्हा मी स्वतःला सांगायचो, कंट्रोल आशिष कंट्रोल’  मी ज्या-ज्या भूमिका करतो, त्यांच्यासारखे जगण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून चित्रीकरणावेळी मी सर्वोत्तम काम करू शकेन.

वर्कफ्रंट

आशिषने अनेक मालिकांमध्ये काम केले असून यात कुमकुम भाग्य, प्यार को हो जाने दो आणि तारा फ्रॉम सातारा तसेच, लव्ह यूवर फॅमिली यांचा समावेश आहे. झी५ वर १७ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक मनीष गुप्ता यांच्या ४२० आयपीसी या बिग-बॅनर बॉलिवूड चित्रपटात तसेच मुहम्मद बर्मावाला दिग्दर्शित मराठी चित्रपट लग्न कल्लोळ या आगामी चित्रपटांमध्ये आशिष महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपला देश कोव्हिडशी लढत असताना अभिनेता आशिष याने पुन्हा डॉक्टरकीची प्रॅक्टिस सुरू केली आणि आपल्या देशातील आघाडीच्या कोव्हिड योद्धांपैकी तो एक होता.

Web Title: Doctor-actor Ashish Gokhale's comeback on the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.