'डॉक्टर गुलाटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 06:13 PM2018-09-22T18:13:17+5:302018-09-24T06:00:00+5:30

छोट्या पडद्यावरील कपिल शर्माच्या शोमधून विनोदवीर सुनिल ग्रोवरने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याने या शोमध्ये 'डॉक्टर गुलाटी'चे पात्र साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवले होते.

'Doctor Gulati' will soon be meeting the audience | 'डॉक्टर गुलाटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'डॉक्टर गुलाटी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
ठळक मुद्देसुनिल ग्रोवर पुन्हा साकारणार डॉक्टर गुलाटीसुनिल ग्रोवर सध्या 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त

छोट्या पडद्यावरील कपिल शर्माच्या शोमधून विनोदवीर सुनिल ग्रोवरने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्याने या शोमध्ये 'डॉक्टर गुलाटी'चे पात्र साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र, या शोमधून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांना त्याच्या परतण्याची अपेक्षा होती. आता चाहत्यांची हीच अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहे.


सुनिल ग्रोवर डॉक्टर गुलाटीच्या भूमिका साकारून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसणार आहे. वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार, सुनिल ग्रोवर 'इंडियन आयडॉल' या लोकप्रिय कार्यक्रमात 'डॉक्टर गुलाटी' बनून येणार आहे.  इंडियन आयडॉलचा 'ग्रॅण्ड फिनाले' लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सुनिल ग्रोवरचा विनोदी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. याच शोमध्ये तो नेहा कक्करचे स्वयंवर करतानाही दिसणार आहे. 
सुनिल ग्रोवर सध्या सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच तो 'पटाखा' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
चरण सिंग पथिक यांच्या लघुकथेवर पटाखा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाची कथा राजस्थानमधील दोन बहीणींची भवती फिरणारी आहे. बडकी आणि छुटकी नावाच्या दोन बहिणी नेहमी एकमेकींशी भांडत असतात. मात्र लग्न झाल्यावर त्यांना कळते की त्या एकमेकींशिवाय राहु शकत नाही. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. सुनील ग्रोव्हर आणि विशाल भारद्वाज पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याआधी सुनील ग्रोव्हरने गजनी सिनेमात अभिनेत्री असिनच्या मित्राची भूमिका साकारली होती.   

Web Title: 'Doctor Gulati' will soon be meeting the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.