'ही' व्यक्ती गरिमा साकारत असलेल्या भूमिकेचा करते तिरस्कार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 06:33 AM2018-03-28T06:33:55+5:302018-03-28T12:03:55+5:30

वेगवेगळ्या लोकांवर टीव्हीचा परिणाम भिन्न होतो; पण लहान मुलांवर हा परिणाम विशेष करून वेगळा असतो.आपल्या पालकांना त्यांच्या वास्तव जीवनातील ...

Does this person hate the role of dignity? | 'ही' व्यक्ती गरिमा साकारत असलेल्या भूमिकेचा करते तिरस्कार?

'ही' व्यक्ती गरिमा साकारत असलेल्या भूमिकेचा करते तिरस्कार?

googlenewsNext
गवेगळ्या लोकांवर टीव्हीचा परिणाम भिन्न होतो; पण लहान मुलांवर हा परिणाम विशेष करून वेगळा असतो.आपल्या पालकांना त्यांच्या वास्तव जीवनातील स्वभावापेक्षा अगदी वेगळ्याच स्वभावाची भूमिका रंगवताना पाहून त्यांच्या भावनांवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येते.‘स्टार भारत’वरील ‘निम्की मुखिया’ मालिकेत गरिमा विक्रांत सिंह ही अभिनेत्री अनाडो देवी ही नकारात्मक भूमिका साकारीत आहे.या भूमिकेमुळे गरिमाच्या लोकप्रियतेत खूपच वाढ झाली असून प्रेक्षकांमध्ये ही भूमिकाही लोकप्रिय बनली आहे.गरिमाला आठ वर्षांची मुलगी असून ती आपल्या आईची ही मालिका नियमितपणे पाहात असते.पण गरिमाला या भूमिकेत पाहणे तिला आवडत नाही. या मालिकेत जे काही दाखवतात ते सर्व खरेच आहे, अशी तिची समजूत बनली आहे. तिच्या मते,या मालिकेत जे काही दाखवले जाते, ते सारे वास्तव जीवनात खरोखरच घडत आहे आणि दुस-यांबद्दल वाईट बोलणार्‍या आणि त्यांचे वाईट चिंतणा-या आपल्या आईला पाहून तिला अतिशय दु:ख होते.त्यामुळे गरिमा जेव्हा घरी जाते, तेव्हा तिची मुलगी तिला असा दुष्टपणा न करण्याचे वारंवार सांगत असते.गरिमा म्हणाली, “माझ्या मुलीला मी मालिकेत नेगेटीव्ह भूमिका साकारणे अजिबात आवडत नाही.आणि त्यात खटकणारा सीन बघितला तर मी घरी जाताच तिची समजूत मला काढावी लागते.मी एक्टींग करते फक्त तिलाही ते कळत असतं.पण तरीही आपल्या आईने भूमिकाही सोज्वळच निवडाव्या अशा आग्रह तिचा असतो.मुळात तिने माझ्या मालिका पाहू नये, याचा मी शक्यतो प्रयत्न करत असते.पण कितीही केलं तरीही ते बघितलं जातंच.शेवटी कलाकार असल्यामुळे विविध छटा असलेल्या भूमिका करणे ओघाने आलेच. ती लहान आहे अजून या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी. मला विश्वास आहे की ती मला समजून घेईन.

टीव्ही मालिकांमध्ये पुरुष अभिनेते हे केवळ दाखविण्यासाठी असतात.पण खरे महत्त्व महिला अभिनेत्रींनाच असते असे सांगितले जाते.टीव्हीवरील मालिकांचे विषय आणि हाताळणी दिवसेंदिवस प्रगत होत असून त्यातील विषय हे महिलाकेंद्रित होत आहेत.त्यामुळे काही अभिनेत्यांच्या मनात मालिकांमध्ये आपल्याला फारसे महत्त्व दिले जात नसल्याची भावना मूळ धरू लागली आहे.‘निम्की मुखिया’ मालिकेत ‘ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी’ (बीडीओ) अभिमन्यू सिंहची भूमिका रंगविणारा अभिनेता इंद्रनील सेनगुप्ताची भूमिका चांगल्या वाटेवर सुरू झाली.त्याला निम्कीचा मार्गदर्शक असल्याचे दाखविले जात होते.तसेच तो निम्कीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे सूचित केले जात होते.यथावकाश त्याच्या व्यक्तिरेखेचाही विकास केला जाईल आणि त्याच्या प्रेमाच्या दृष्टिकोनाचा विस्तार केला जाईल, असे त्याला सांगण्यात आले होते. पण तसे काहीच घडले नाही. आता तर निम्कीचे लग्न बब्बूसिंह याच्याशी होत आहे. परिणामी सुरुवातीला महत्त्वाची वाटत असलेली इंद्रनीलची व्यक्तिरेखा आता दुय्यम ठरत चालली आहे.सेटवरील एका सूत्राच्या म्हणण्यानुसार,गृहित धरले जात असल्याची भावना इंद्रनीलच्या मनात निर्माण झाली असून त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण आता रोज होण्याऐवजी आठवड्यातून केवळ तीनच दिवस होऊ लागले आहे.मालिकेचे कथानक ज्या दिशेने जात आहे, ते पाहता मालिकेतील आपली व्यक्तिरेखा आता महत्त्वाची राहिलेली नाही,असे इंद्रनीलचे मत बनले आहे.इंद्रनीलचे नक्कीच काहीतरी बिनसले आहे असे दिसते.

Web Title: Does this person hate the role of dignity?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.