‘बिग बॉस’मधील ‘या’ ड्रामा क्वीनने जलपरीच्या ड्रेसमधील फोटो केले शेअर; यूजर्सचा झाला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 12:11 PM2018-03-10T12:11:07+5:302018-03-10T17:41:18+5:30

बिग बॉसच्या गेल्या सीजनमध्ये ड्रामा क्वीन या नावाने ओळखल्या गेलेली टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या जलपरीच्या ड्रेसमुळे यूजर्सकडून चांगलीच ट्रोल होत आहे.

'Drama Queen' in 'Bigg Boss' shares photos in a Nerd Dresses; The anger of the user! | ‘बिग बॉस’मधील ‘या’ ड्रामा क्वीनने जलपरीच्या ड्रेसमधील फोटो केले शेअर; यूजर्सचा झाला संताप!

‘बिग बॉस’मधील ‘या’ ड्रामा क्वीनने जलपरीच्या ड्रेसमधील फोटो केले शेअर; यूजर्सचा झाला संताप!

googlenewsNext
परस्टार सलमान खानच्या ‘बिग बॉस-११’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकलेल्या अभिनेत्री हिना खान हिला यूजर्सच्या संतापाचा चांगलाच सामना करावा लागत आहे. बिग बॉस या शोमध्ये ड्रामा क्वीन म्हणून समोर आलेली हिना खान या शोची उपविजेती ठरली. वास्तविक हिना खान या अगोदरही यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. परंतु यावेळेस ती तिच्या ड्रेसमुळे ट्रोल होत आहे. हिनाने फिशटेल स्टाइल ड्रेसवरील फोटो अपलोड करताच लोकांनी त्यास उलटसुलट कॉमेण्ट देण्यास सुरुवात केली. अनेकांनी तिला अतिशय अपशब्दांमध्ये खडेबोल सुनावले. 
 

केवळ १४ तासांच्या आतच तिच्या या फोटोंना दोन लाख ३५ हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाल्या. त्याचबरोबर हजारो कॉमेण्ट्स दिल्या. एकीकडे हिनाचे चाहते तिच्या आउटफिटचे कौतुक करीत असताना अनेकांनी त्यास उलट सुलट कॉमेण्ट्स दिल्या. विशेष म्हणजे हिनाच्या या फोटोंवरून तिचे चाहते अन् अन्य यूजर्समध्ये चांगलीच खडाजंगी बघावयास मिळाली. कारण काही चाहते तिच्या या फोटोंचे कौतुक करताना दिसले तर काही तिच्यावर टीका करताना बघावयास मिळाले.
 

दरम्यान, हिना खानने तिचे हे फोटो दुबई येथे शूट केले आहेत. तिचा हा ड्रेस फॅशन डिझायनर निकिता टंडन हिने डिझाइन केला. तर या ड्रेसवर हिनाने घातलेली एक्सेसरिज ओम ज्वेलर्सने डिझाइन केली. हिना दुबई अगोदर श्रीलंका येथे गेली होती. ज्याठिकाणी तिने एका ब्रॅण्डसाठी मॉडलिंग केली. 

Web Title: 'Drama Queen' in 'Bigg Boss' shares photos in a Nerd Dresses; The anger of the user!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.