या अभिनेत्याचे सुयज घोषमुळे झाले हे स्वप्न पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 10:56 AM2018-04-23T10:56:31+5:302018-04-23T16:26:31+5:30
दिग्दर्शक सुजय घोष यांच्या सहकार्याने ‘स्टार प्लस’ निर्मिती करीत असलेल्या ‘तीन पहेलिया’ या तीन लघुपटांच्या मालिकेत हिंदी चित्रपटसृष्टीतील काही ...
द ग्दर्शक सुजय घोष यांच्या सहकार्याने ‘स्टार प्लस’ निर्मिती करीत असलेल्या ‘तीन पहेलिया’ या तीन लघुपटांच्या मालिकेत हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत कलाकार भूमिका साकार करीत आहेत. विक्रांत मेसी हे त्यापैकीच एक नाव.घोष यांच्या दिग्दर्शनाची विक्रांतने अलीकडेच एका मुलाखतीत खूप प्रशंसा केली होती. विक्रांत म्हणाला, “सुजय घोष यांच्या ‘तीन पहेलिया’ या नव्या चित्रपटात भूमिका रंगविणार आहे, यावर प्रथमत: माझा विश्वासच बसत नव्हता. सुजय घोष हे माझं प्रेरणास्थान असून त्यांचे चित्रपट या अभिजात कलाकृतीच मानल्या जातात. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे माझ्या स्वप्नांची पूर्तता झाल्यासारखं आहे. ते एक अगत्यशील दिग्दर्शक असून आपल्या चित्रपटांतील व्यक्तिरेखांबद्दल ते अतिशय काटेकोर असतात. ‘कॉपी’ या लघुपटात भूमिका रंगविताना मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांचं काम बघून मी थक्कच झालो.” लिपस्टिक अंडर माय बुरखा, लुटेरा, दिल धडकने दो आणि ए डेथ इन द गंज यासारख्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये विक्रांतने भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील मालिकांमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली असून तो आता सुजय घोष यांच्या कॉपी या लघुपटात एक भूमिका रंगविणार आहे.
'तीन पहेलिया' या आपल्या तीन लघुपटांद्वारे नामवंत चित्रपट दिग्दर्शक सुजय घोष हे टीव्हीवर पदार्पण करणार आहेत.आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन करण्याच्या आपल्या ध्येयानुसार ‘स्टार प्लस’ने यावेळी चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक सुजय घोष यांच्याशी सहकार्याचा करार केला आहे.'गुडलक','मिर्ची मालिनी' आणि 'कॉपी' अशी या तीन लघुटांची नावे असून ‘तीन पहेलिया’ या सार्थ नावाखाली ‘स्टार प्लस’वरून ते एकापाठोपाठ एक प्रसारित केले जातील.त्यात अनेक नामवंत कलाकार भूमिका रंगविणार असून सुरवीन चावला ही त्यापैकी एक कलाकार आहे.यंदाच्या उन्हाळ्याच्या मोसमात ‘स्टार प्लस’ आपल्या प्रेक्षकांसाठी एक थरारक मालिका घेऊन येत आहे.आपल्या प्रेक्षकांचे वैविध्यपूर्ण मनोरंजन करण्याच्या आपल्या ध्येयानुसार ‘स्टार प्लस’ने यावेळी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुजय घोष यांच्याशी सहकार्याचा करार केला आहे.