​सुपर डान्सरमधील दिपालीचे हे स्वप्न पूर्ण झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 11:50 AM2016-12-16T11:50:55+5:302016-12-16T11:50:55+5:30

सुपर डान्सर या कार्यक्रमात सध्या लहान मुले एकापेक्षा एक नृत्य सादर करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा ...

This dream of Super Dancer is complete | ​सुपर डान्सरमधील दिपालीचे हे स्वप्न पूर्ण झाले

​सुपर डान्सरमधील दिपालीचे हे स्वप्न पूर्ण झाले

googlenewsNext
पर डान्सर या कार्यक्रमात सध्या लहान मुले एकापेक्षा एक नृत्य सादर करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. या कार्यक्रमाची फायनल आता रंगणार आहे. सगळ्या स्पर्धकांमधून आता दिपाली बोरकर, दित्य सागर, मासूम नरझारी, योगेश शर्मा हे स्पर्धक अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. यांच्यामधून कोण विजेता ठरणार हे लवकरच कळेल. 
या स्पर्धकांमधील दिपाली बोरकरला तर या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळण्याआधीच एक खूप चांगली संधी मिळाली आहे. बाजीराव मस्तानी ही मालिका काहीच दिवसांत सुरू होणार असून या मालिकेत ती छोट्या काशीबाईची भूमिका साकारणार आहे. दिपाली सुपर डान्सरनंतर बाजीराव मस्तानीच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. सध्या ती सुपर डान्सरसाठी खूप मेहनत घेत आहे. दिपाली सांगते, "मला लहानपणापासून नृत्याची आवड होती. शाळेतील कार्यक्रमात मी नेहमीच नृत्य सादर करत असे. माझे नृत्य पाहून शाळेतील शिक्षक माझे नेहमीच कौतुक करायचे. मला डान्स क्लासेसमध्ये टाकावे असे त्यांनीच माझ्या कुटुंबीयांना सुचवले. त्यामुळे मी गेल्या दोन वर्षांपासून नृत्य शिकत आहे. सुपर डान्सरचा माझा अनुभव खूपच छान आहे. मला या कार्यक्रमामुळे खूप काही शिकायला मिळाले. तसेच या कार्यक्रमातील परीक्षक हे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज असले तरी ते आमच्यासोबत खूपच चांगल्याप्रकारे वागतात. चित्रीकरणादरम्यान शिल्पा शेट्टी, गीता कपूर, अनुराग बासू आमच्यासोबत खूप गप्पा मारतात. आमच्यासोबत खूप सारे फोटो काढतात. अभिनेता रणवीर सिंग तर मला खूपच आवडतो. तो काही दिवसांपूर्वी सुपर डान्सरमध्ये आला होता. त्याला माझे नृत्य खूप आवडले होते. रणवीरला भेटल्यावर माझे एखादे स्वप्नच पूर्ण झाले आहे असे मला वाटले होते." 

Web Title: This dream of Super Dancer is complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.