HBD Shakti Mohan: IAS बनण्याचं स्वप्न होतं पण बनली कोरिओग्राफर; Shakti Mohan ची एकूण संपत्ती किती? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 01:12 PM2021-10-12T13:12:00+5:302021-10-12T13:12:21+5:30
शक्ती बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. राऊडी राठोड आणि कांचीसारख्या सिनेमांमधील आयटम सॉग्न शक्तीने परफॉर्म केले आहे.
मुंबई – कोरिओग्राफर शक्ती मोहननं तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंडस्ट्रीमध्ये शक्ती सध्या यशाच्या शिखरावर पोहचली आहे. शक्तीच्या चाहत्यांमध्ये मोठा युवा वर्गाचा समावेश आहे. परंतु हे यश गाठण्यासाठी शक्तीला प्रचंड मेहनत करावी लागली. आज शक्ती मोहन(Shakti Mohan) तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
शक्तीने तिच्या करिअरची सुरुवात डान्स रिएलिटी शो डान्स इंडिया डान्स २(Dance India Dance) याने केली. या शोच्या स्पर्धेत सहभाग घेऊन शक्तीने त्याची ट्रॉफीही जिंकली होती. या शोनंतर शक्तीने जीवनात कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज शक्तीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या एकूण संपत्तीविषयी आणि तिच्या पर्सनल लाईफबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत.
रिपोर्टनुसार, शक्ती मोहनची एकूण संपत्ती जवळपास ३७ कोटींची आहे. तिचा इन्कम सोर्स डान्स, रिएलिटी शो आणि सिनेमा यातून मिळतो. इतकचं नाही तर शक्तीनं स्वत:ची डान्स एकेडमीही उघडली आहे. डान्स इंडिया डान्स जिंकल्यानंतर शक्तीने तिच्या अभिनयाची सुरुवात केली. दिल दोस्ती डान्स या सीरियलमध्ये तिने काम केले. त्याशिवाय झलक दिखला जा, नच बलिए, डान्स दिवाने यातही तिचा सहभाग होता. शक्ती सध्या डान्स रिएलिटी शो मध्ये जज म्हणून काम करते. सुरुवातीपासून ती या कार्यक्रमाचा एक भाग राहिली आहे. अनेक सीजन तिने जज म्हणून काम केले आहे. या शोमध्ये शक्ती आणि होस्ट राघव यांचे किस्से चाहत्यांना खूप आवडतात.
शक्ती बॉलिवूड सिनेमातही झळकली आहे. राऊडी राठोड आणि कांचीसारख्या सिनेमांमधील आयटम सॉग्न शक्तीने परफॉर्म केले आहे. तसेच अन्य सिनेमातही शक्तीने कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे. पद्मावत सिनेमातील नैनोवाले गाण्याचं कोरियोग्राफी तिने केली. शक्ती शिक्षणातही खूप हुशार आहे. तिला IAS व्हायची इच्छा होती. तर डान्स करणं तिला खूप आवडायचं. आपल्या आवडीलाच शक्तीने प्रोफेशनमध्ये बदलून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आता शक्ती मोहननं डान्समध्ये डिप्लोमा केला आहे. मात्र IAS अधिकारी बनण्याचं शक्तीचं स्वप्न अपूर्ण राहिलं.