या कारणामुळे रवी दुबे चक्रावून गेला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 07:42 PM2018-10-08T19:42:58+5:302018-10-08T19:44:16+5:30

नवरात्रीचा उत्सव अगदी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’वरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमाने टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणले आहे.

Due to this reason, Ravi Dubey was shocked | या कारणामुळे रवी दुबे चक्रावून गेला होता

या कारणामुळे रवी दुबे चक्रावून गेला होता

googlenewsNext
ठळक मुद्देरवी दुबेने केला आफ्रो दांडिया डान्स

नवरात्रीचा उत्सव अगदी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’वरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमाने टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणले आहे. या कलाकारांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण नृत्याने दांडियाला वेगळीच खुमारी दिली आहे. असेच एक आफ्रो नृत्य टीव्हीवरील सर्वांचा लाडका कलाकार रवी दुबेने बेमालूम पद्धतीने सादर केले होते.


हे नृत्य सादर करता आल्याबद्दल खुश झालेल्या रवी दुबेने सांगितले, “नवरात्र आणि दसरा हे दोन सण एकत्रितपणे साजरे करण्याची संधी देणाऱ्या ‘स्टार प्लस’वरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमात मला सहभागी होता आले, याचा मला खूप आनंद वाटतो. या कार्यक्रमात मला एक नृत्य सादर करायचे होते आणि त्यासाठी मला तब्बल आठ नकली टॅटू अंगावर लावावे लागतील, हे ऐकून मी चक्रावलो होतो. मी आजवर कोणत्याही कार्यक्रमात असा वेश धारण केलेला नव्हता. या टॅटूंमुळे माझा नेहमीचा गोमटा चेहरा अगदी बदलून जाणार होता. पण या आफ्रो दांडिया नृत्याने मला एक प्रकारचे आव्हान दिले आणि आपण काहीतरी नवे आणि वैशिष्ट्यपूर्ण करीत असल्याची सुखद जाणीव करून दिली. यावेळी मी प्रथमच आफ्रो आणि दांडिया या नृत्यप्रकारांचा संगम घडविणार होतो. माझे नृत्यकौशल्य सादर करण्यासाठी
दांडियासारखा दुसरा योग्य कार्यक्रम कोणता असणार! माझ्याप्रमाणेच प्रेक्षकांना हे नृत्य पाहताना आनंद वाटेल, अशी आशा करतो.”
सनाया इराणी, जय भानुशाली आणि किकू सारडा या देशातील तीन अग्रगण्य आणि विनोदी सूत्रसंचालकांकडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देण्यात आले आहे. टीव्हीवरील नेहमीचे लोकप्रिय कलाकार यात आगळी नृत्ये सादर करताना पाहून प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता वाटेल.

Web Title: Due to this reason, Ravi Dubey was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.