"माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती..." श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 05:29 PM2024-08-16T17:29:48+5:302024-08-16T17:30:20+5:30

Shweta Tiwari And Palak Tiwari : श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. पलकने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

"Due to the journey in my life, she..." Palak Tiwari's childhood was ruined due to the breakup of Shweta Tiwari's marriage? The actress left her silence | "माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती..." श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन

"माझ्या जीवनातील प्रवासामुळे ती..." श्वेता तिवारीचे लग्न तुटल्यामुळे बर्बाद झालं पलकचं बालपण? अभिनेत्रीनं सोडलं मौन

कसौटी जिंदगी की फेम श्वेता तिवारी(Shweta Tiwari)ने १९९८ मध्ये भोजपुरी अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केले. या लग्नापासून त्यांना पलक तिवारी ही मुलगीही आहे. या लग्नात श्वेताला अडचणींचा सामना करावा लागला. २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. श्वेताने राजा चौधरीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. घटस्फोटानंतर श्वेताला पलक(Palak Tiwari)ची कस्टडी मिळाली. यानंतर श्वेता तिवारीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने प्रवेश केला आणि अभिनेत्रीने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले.

पण इथेही अभिनेत्रीला प्रेमात अपयश आले आणि तिच्या आणि अभिनवच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यानंतर २०१९ मध्ये अभिनव आणि श्वेता यांचा घटस्फोट झाला. श्वेताला दुसऱ्या लग्नापासून रेयांश हा मुलगा आहे. रेयांश श्वेतासोबत राहतो. श्वेताने अभिनववर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. दोन्ही तुटलेल्या लग्नानंतर श्वेता तिवारीला बराच काळ अडचणींचा सामना करावा लागला. अलीकडेच श्वेताने तिचे मोडलेले लग्न आणि त्याचा तिची मुलगी पलक तिवारीच्या बालपणावर झालेला परिणाम याबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.

''त्यानुसार पलकने स्वत:ला जुळवून घेतले''
मुलाखतीत बोलताना श्वेता तिवारी म्हणाली की, तिच्या मोडलेल्या लग्नांमुळे तिला तिच्या मुलीच्या बालपणाची खूप काळजी वाटत होती. पण पलकने सर्व काही सकारात्मकतेने घेतले आणि त्यानुसार स्वत:ला जुळवून घेतले. त्या काळात पलक मला दिसायची तेव्हा ती मोठी झाल्यावर तिचे बालपण कसे असेल असा प्रश्न मला पडायचा. कसे तरी तिने सर्वकाही सामान्य म्हणून घेतले आणि स्वत:ला वेगळ्या पद्धतीने जुळवून घेतले.

''पलक खूप ताकदवान मुलगी आहे''
अभिनेत्री पुढे म्हणाली की, 'माझे पालनपोषण कमी आणि तिची संवेदनशीलता जास्त आहे. पलक खूप ताकदवान मुलगी आहे. मला बघून, ती शिकली आहे की जर तुम्ही स्वतःला हलक्यात घेतले नाही तर कोणीही घेणार नाही. तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर ती तुम्हालाच सोडवावी लागेल. माझ्या प्रवासातून माझी मुलगी भावनिकदृष्ट्या खूप मजबूत झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे ती खूप खंबीर झाली आहे.


श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी देखील खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. पलकने सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अवघ्या २२ वर्षांच्या पलकचे खूप चाहते आहेत. पलकचे तिची आई श्वेतासोबतही छान बॉण्डिंग आहे.

Web Title: "Due to the journey in my life, she..." Palak Tiwari's childhood was ruined due to the breakup of Shweta Tiwari's marriage? The actress left her silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.