'दुनिया में रहना है तो...', 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धनं आप्पांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 12:15 PM2022-09-10T12:15:47+5:302022-09-10T12:16:22+5:30

मिलिंद गवळीने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करतेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत आप्पा उर्फ किशोर महाबोले यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

'Duniya Mein Rehna Hai To...', Anirudh's post for Appa in 'Aai Khe Kay Karte' is in discussion | 'दुनिया में रहना है तो...', 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धनं आप्पांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

'दुनिया में रहना है तो...', 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धनं आप्पांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अग्रेसर असते. या मालिकेच्या कथानकासोबतच पात्रांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकारांचे कामाप्रती असलेली निष्ठा आपल्याला पाहायला मिळते. असाच एक अनुभव या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी(Milind Gawali)ने सांगितला आहे. यात त्याने आप्पा उर्फ किशोर महाबोले (Kishor Mahabole) यांच्याबद्दल सांगितले आहे. मिलिंद गवळीची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

मिलिंद गवळीने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करतेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आप्पांच्या अंगात ताप होता, अंगात कणकण होती, थकवा आला होता, त्यांना बसता सुद्धा येत नव्हतं, त्यांना खूपच त्रास होत होता, गोळ्या औषध घेऊन सुद्धा दोन-तीन दिवस तो ताप उतरत नव्हता, कणकण थांबत नव्हती, पण ते शूटिंग करत होते, कारण एपिसोड जायचा होता,आपण शूटिंग केलं नाही तर एपिसोड अडकेल.


त्याने पुढे म्हटले की, आई कुठे काय करते यशस्वी होण्याचा एक कारण हे पण आहे की कलाकार जीव ओतून काम करतात, आपल्या कामावर अतोनात प्रेम करतात, काही महिन्यापूर्वी किशोरजी एक सीन करत होते आणि त्यांच्या घरून फोन आला की त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे, सोलापूरला लगेच निघावं लागणार आहे, डायरेक्टर @ravikarmarkar रवी करमरकर म्हणाले की आप्पा तुम्ही ताबडतोब निघा, पण आप्पांनी सीन पूर्ण करायचा निर्णय घेतला, वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर एक विनोदी सीन करणं किती यातना देणारं असू शकतं याची कल्पना करणं खूप कठीण आहे.


या पावणेतीन वर्षांमध्ये बहुतेक सगळ्या कलाकारांनी आणि “आई कुठे काय करते”च्या टीम ने शारीरिक, मानसिक ,कौटुंबिक समस्या बाजूला ठेवून खूप कठीण परिस्थितीमध्ये शूटिंग पूर्ण केलं आहे. बरं या गोष्टींचा बाऊ न करता, त्याची सहानुभूती न घेता, हे जे काय काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहणे, कामालाच महत्त्व देत राहाणे. आपल्यामुळे ८० लोकांच्या युनिटला त्रास होऊ नये, त्यांचं नुकसान होऊ नये, हे एक खूप महत्त्वाचं कारण असतं. हे सगळं हसत खेळत मस्ती करत चाललेलं असतं. हा जो बीटीएस BTS मी शूट केला आहे त्याच्याने तुम्हा प्रेक्षकांना थोडासा अंदाज येईल. दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे...असेही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: 'Duniya Mein Rehna Hai To...', Anirudh's post for Appa in 'Aai Khe Kay Karte' is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.