'नजर'मध्ये नियती फटनानी दिसून येणार दुर्गावतारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 06:00 IST2018-10-12T14:38:44+5:302018-10-14T06:00:00+5:30
स्टारप्लसवरील नजर मालिका आता चाहत्यांची अतिशय आवडती बनलेली असून यातील जबरदस्त कथा आणि अफलातून नाट्यमय वळणांमुळे मालिकेला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

'नजर'मध्ये नियती फटनानी दिसून येणार दुर्गावतारात
स्टारप्लसवरील नजर मालिका आता चाहत्यांची अतिशय आवडती बनलेली असून यातील जबरदस्त कथा आणि अफलातून नाट्यमय वळणांमुळे मालिकेला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. नवरात्रौत्सव आता सुरू झाला असून ह्या शोमधील पिया (नियती फटनानी) एक दैविक असून तिला तिच्या ताकदीची जाणीव झाली आहे आणि ती डायन मोहनाने पाठवलेल्या राक्षसासोबत युद्ध करण्यासाठी दुर्गावतार घेते. नियतीने आपल्या दुर्गावतारासाठी खूप तयारी केली. ह्या आगामी दृश्याचे चित्रीकरण करताना तिला खूप छान अनुभव आला. आपल्या देवीअवताराबद्दल ती खूप उत्साहात आहे. नियती म्हणाली, “हा अवतार साकारताना मला मला खूप शक्तीशाली वाटले. पिया लवकरच तिच्या देवीरूपात दिसून येईल. निर्मात्यांना पियाचा देवीचा लूक अगदी अचूक हवा होता. त्यामुळे त्यांनी मला सुंदर रेशमी साडी दिली आणि काही नाजूक सुंदर दागिनेसुद्धा. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा असतेच असा माझा विश्वास असून स्त्री ही तिला वाटते त्यापेक्षा कितीतरी जास्त कणखर आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला ऑनस्क्रीन हा अवतार साकारायला मिळाला. चाहत्यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी मी उत्सुक आहे. नजरमधील हे जबरदस्त नाट्य आगामी भागांमध्ये प्रेक्षकांचे मन निश्चितपणे वेधून घेईल.”
'नजर' ही अमानवी शक्तींवर आधारित मालिका असून त्याचे कथानक मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरात घडते. या शहरात राहणाऱ्या राठोड परिवाराच्या अनेक पिढ्यांवर एका डायनची वाईट नजर पडलेली असते आणि त्यामुळे त्यांचे जीवन कसे संकटमय होते, त्याची ही कथा आहे. 'नजर' या मालिकेत रितू सेठ सोबतच मोनालिसा, स्मिता बन्सल, इशिता धवन, कपिल सोनी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत.