पृथ्वी वल्लभमध्ये मित्र झाले शत्रू ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 04:07 AM2018-04-12T04:07:31+5:302018-04-12T09:37:31+5:30

अनिरुद्ध पाठकच्या पृथ्वी वल्लभ मालिकेत उत्तम कथानकासह अॅक्शन आणि नाट्य ठासून भरलेले आहे. याचे कथानक प्रेम आणि युद्ध यांच्या ...

Earth collided with friends? | पृथ्वी वल्लभमध्ये मित्र झाले शत्रू ?

पृथ्वी वल्लभमध्ये मित्र झाले शत्रू ?

googlenewsNext
िरुद्ध पाठकच्या पृथ्वी वल्लभ मालिकेत उत्तम कथानकासह अॅक्शन आणि नाट्य ठासून भरलेले आहे. याचे कथानक प्रेम आणि युद्ध यांच्या भोवती फिरते आहे. पृथ्वी वल्लभची भूमिका करणारा आशीष शर्मा हा एक अत्यंत कुशल कलाकार आहे आणि मृणालची भूमिका साकारणारी सोनारिका भदोरिया एक भयंकर योद्धा आहे. येत्या काही भागांत पृथ्वी वल्लभ मान्यखेटला जाण्याचे ठरवतो, जर कल्लारी (मुकेश ऋषी) कडून अनुमती मिळाली तर मुकेश ऋषी एक उत्तम कलाकार आहे आणि या मालिकेत तो कल्लारीची भूमिका साकारतो आहे. तो पृथ्वीला युद्धाचे आव्हान देतो आणि तो पृथ्वी जर त्याला हरवू शकला तर तो मान्यखेटला जाऊ शकेल अशी अट घालतो. पडद्यावरील हे आव्हान आणि प्रत्यक्षातील त्यांचे नाते हे दोन्ही पाहता हे दृश्य चित्रित करणे अवघड होते का? यावर मुकेश ऋषी सांगतो, “आशीष शर्मा आणि मी खास मित्र आहोत आणि सेटवर आणि सेटच्या बाहेर देखील आमचे संबंध खूप जवळीकीची आहेत. तो मला भावासारखा आहे आणि तो आसपास असला की मला बरे वाटते. या दृश्यासाठी आम्ही काही विशेष असे प्रशिक्षण घेतले नाही येथे आमचा अनुभवच कामाला आला. आम्ही दोघेही खूप वर्क-आऊट करतो आणि अनेक वर्षांपासून जिममध्ये जातो आहोत. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे आणि मी अनेक चित्रपटांत काम केले आहे व त्यांत हाणामारीची दृश्ये केली आहेत. त्यामुळे आम्ही विश्वसनीय वाटावे अशा पद्धतीने स्वाभाविकपणे हे दृश्य केले. आम्हाला जेव्हा या युद्धाबद्दल सांगण्यात आले होते, तेव्हा आम्ही हे चित्रीकरण करण्यास उत्सुक होतो कारण प्रत्यक्ष लढाई रेतीमध्ये झाली व त्यात पृथ्वी आपल्या गुरुची आज्ञा मानून प्रतिकार करत नाही.”

मुकेश ऋषी हा मनोरंजन क्षेत्रातील एक वरिष्ठ कलाकार आहे आणि त्याला हे दमछाक करणारे युद्ध शिकावे लागले पण त्याच वेळी कुस्तीचे कौशल्य शिकण्यास तो उत्सुक होता. हे संपूर्ण दृश्य एका रेतीच्या खड्ड्यात चित्रित झाले व या युद्धात कुस्तीचा समावेश होता व त्यासाठी खूप फिटनेस असणे गरजेचे होते. पण दोहोंकडे तो फिटनेस आधीपासूनच होता.

Web Title: Earth collided with friends?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.