'वागळे कि दुनिया मालिकेच्या सेटवर साजरी झाली इको-फ्रेंडली दिवाळी, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:58 PM2022-10-20T12:58:10+5:302022-10-20T13:15:08+5:30

दिवाळीत होणार प्रदूषण टाळण्यासाठी या मालिकेच्या संपूर्ण टीमने वृक्षारोपण करून इको-फ्रेंडली दिवाळी साजरी केली.

Eco-friendly Diwali celebrated on the sets of 'Wagle Ki Duniya' | 'वागळे कि दुनिया मालिकेच्या सेटवर साजरी झाली इको-फ्रेंडली दिवाळी, जाणून घ्या याविषयी

'वागळे कि दुनिया मालिकेच्या सेटवर साजरी झाली इको-फ्रेंडली दिवाळी, जाणून घ्या याविषयी

googlenewsNext

सोनी सब वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वागळे कि दुनिया हि मालिकेत सहजरित्या सादर करणाऱ्या विषयांमुळे प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेचं कथानक सामान्य लोकांप्रमाणेच दैनंदिन जीवनात समस्‍यांचा सामना करणाऱ्या आणि एकत्र त्‍यावर मात करणाऱ्या वागळे कुटुंबाच्‍या अवतीभोवती फिरते. या सेटवर कलाकारांनी केलेल्या इको-फ्रेंडली दिवाळी सेलिब्रेशनमधून देखील खूप काही शिकण्यासारखं आहे. 

मोठ्या उत्साहात या मालिकेच्या संपूर्ण टीमने वृक्षारोपण केलं. दिवाळीत होणार प्रदूषण टाळण्यासाठी या मालिकेच्या संपूर्ण टीमने वृक्षारोपण करून इको-फ्रेंडली दिवाळी साजरी केली. त्याचसोबत सेटवर धमाल धमाल होतीय वातावरणाची धामधूम देखील होती, ज्यात उपस्थित कलाकारांनी उत्‍साहात गप्‍पागोष्‍टी केल्‍या आणि मनसोक्‍तपणे फराळाचा आस्‍वाद घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी मालिकेमधील सुमीत राघवन, परिवा प्रणती, चिन्‍मयी साळवी, शीहान कपाही, अंजन श्रीवास्‍तव, भारती आचरेकर हे कलाकार उपस्थित होते. 

या धमाल सेलिब्रेशनबद्दल बोलताना वागळे की दुनियामध्‍ये राजेश वागळेची भूमिका साकारणारे सुमीत राघवन उत्‍साहाने म्‍हणाला, "दिवाळी हा माझा आवडता सण आहे आणि यावेळी सेटवर आम्ही जी दिवाळी साजरी केली ती खूप खास होती. सह-कलाकारांचा सहवास आणि दिवाळी साजरीकरण म्‍हणून फटाके फोडण्‍याऐवजी वृक्षारोपण आम्ही केलं यामुळे यंदाची दिवाळी खूपच विशेष आहे. ‘वागळे कि दुनिया’मध्‍ये आम्‍ही वृक्षारोपण करत दिवाळी सण साजरा करण्‍याचे ठरवले. माझ्याकडून सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्‍या शुभेच्‍छा! सुरक्षित व आरोग्‍यदायी राहा!’’

Web Title: Eco-friendly Diwali celebrated on the sets of 'Wagle Ki Duniya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.