एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:14 IST2024-05-04T13:13:11+5:302024-05-04T13:14:21+5:30
रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच मनी लॉड्रिंग केसमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
'बिग बॉस ओटीटी' फेम आणि युट्यूबर एल्विश यादव पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच मनी लॉड्रिंग केसमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीकडून एल्विश यादवची चौकशीही केली जाऊ शकते. त्यामुळे एल्विश यादवच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात नोएडामध्ये रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याच्या प्रकरणानंतर मनी लॉड्रिंग केस दाखल करण्यात आली होती. आता याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. लखनऊ झोनल ऑफिसने PMLA (Prevention Of Money Laundring Act) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात एल्विशला ई़डी समन्स पाठवण्याच्या तयारीत आहे. रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादवला मार्च २०२४मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
पीटीआयने दिलेल्या वृतानुसार, एल्विश यादव आणि सापाचं विष पुरवल्याच्या प्रकरणातील अन्य आरोपींची ईडी चौकशी करणार आहे. सापाचं विष विकून अवैधरित्या मिळवलेल्या पैशांबाबत ईडी चौकशी करणार असल्याची माहिती आहे.