स्टार प्रवाहवरील 'शतदा प्रेम करावे'च्या सेटवर आयोजित करण्यात आली इफ्तारची मेजवानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 05:43 AM2018-05-26T05:43:09+5:302018-05-26T11:13:09+5:30
मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू झाला आहे. रमजानच्या काळात दिवसभर रोजा ठेवल्यानंतर (उपवास) संध्याकाळी रोजा सोडला जातो, ...
म स्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू झाला आहे. रमजानच्या काळात दिवसभर रोजा ठेवल्यानंतर (उपवास) संध्याकाळी रोजा सोडला जातो, त्याला इफ्तार असं म्हणतात. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका शतदा प्रेम करावेच्या प्रॉडक्शन टीममधील काही सहकारी रोजा ठेवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सेटवर नुकतीच इफ्तारची मेजवानी देण्यात आली.
शतदा प्रेम करावे मालिकेतील कलाकार अभिजित साटम, ज्ञानदा रामतीर्थकर, प्रिया मराठे, अंगद म्हसकर यांच्यासह मालिकेची टीम इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित होती. खजूर, फळे, समोसे अशा अनेक खाद्य पदार्थांची या पार्टीमध्ये रेलचेल होती. संध्याकाळी सगळ्या टीमने एकत्र येऊन या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि रमजानच्या शुभेच्छाही दिल्या. कौटुंबिक वातावरण हे स्टार प्रवाहच्या मालिकांच्या सेटवरचे वैशिष्ट्य आहे. या इफ्तार मेजवानीच्या निमित्ताने त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.
शतदा प्रेम करावे ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत असल्याचे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट शतदा प्रेम करावे या मालिकेत उलगडली आहे. त्यामुळेच ही प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभली असून त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माण झाले आहे. या मालिकेत अभिजीत उन्मेषच्या तर ज्ञानदा रामतीर्थकर आपल्याला सायलीच्या भूमिकेत दिसत आहे. मालिका सुरू झाली त्यावेळी स्नेहा शहा सायलीची भूमिका साकारत होती. पण काही कारणाने तिला या मालिकेत काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे तिची जागा अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेतली. या मालिकेद्वारे ज्ञानदाने स्टार प्रवाहवर पदार्पण केले होते. ज्ञानदाला अल्पावधीतच प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. तसेच प्रेक्षकांना अभिजीत आणि ज्ञानदामधील केमिस्ट्री देखील आवडत असल्याचे ते आवर्जून सांगत आहेत. शतदा प्रेम करावे मालिकेत आगामी भागांमध्ये देखील अनेक ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
Also Read : 'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले'च्या कथानकात येणार ट्विस्ट