एक्कावन मालिकेचे कच्छमध्ये होणार चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 07:51 AM2018-01-08T07:51:12+5:302018-01-08T13:21:12+5:30
स्टार प्लसवरील एक्कावन ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना ...
स टार प्लसवरील एक्कावन ही मालिका सुरू झाल्यापासून या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील नायिका ही इतर मालिकांमधील नायिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. तिच्या घरातील वडिलधाऱ्या पुरुषांनी तिला लहानाचे मोठे केले असल्याने तिचे वागणे देखील एखाद्या मुलाप्रमाणेच आहे. आता या मालिकेत लवकरच या नायिकेचे लग्न झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. मालिकेत सुशील आणि सत्याशीचे लवकरच लग्न होणार आहे. प्रेक्षक या बहुचर्चित विवाहाची गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहात आहेत. हा विवाह कच्छमध्ये होणार असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कच्छमध्ये लग्न करण्यास सुशील म्हणजेच प्राची तेहलान आणि सत्या म्हणजेच नमिष तनेजा अतिशय उत्सुक आहेत.
एक्कावन मालिकेतील या विवाह सोहळ्याचे चित्रीकरण कच्छच्या रणात करण्यात येणार आहे. या मालिकेतील कुटुंब हे गुजराती असल्याचे दाखवल्यामुळे हे लग्न कच्छमध्ये झाल्याचे दाखवण्यात येणार असून अनेक गुजराती परंपरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कच्छच्या रणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि त्याचा मालिकेशी असलेला संबंध लक्षात घेता या लग्नाचे चित्रीकरण तिथे करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. कच्छच्या रणात चित्रीकरण करण्याच्या कल्पनेने आनंदलेली प्राची सांगते, “डेस्टिनेशन वेडिंगसाठी कच्छचे रण हे अगदी योग्य आहे. या लग्नात सुशील चक्क घागरा-चोळी घालणार असल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माझा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत आजवर प्रेक्षकांना कधीच मला मुलीच्या वेशभूषेत पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे सुशीलला या वेशात पाहिल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल याची मी वाट पाहात आहे. नमिष कच्छमध्ये चित्रीकरण करण्यास खूप उत्सुक आहे. याविषयी तो सांगतो, “अहमदाबाद आणि सुरत यांसारख्या शहरांमध्ये आम्ही आजवर आऊटडोर चित्रीकरण केले आहे. त्यानंतर आता आम्ही रणमध्ये चित्रीकरण करणार आहोत. रणमध्ये चित्रीकरण करायला मिळत असल्याचा मला खूपच आनंद होत आहे. मालिकेचा हा भाग प्रेक्षकांना खूपच आवडेल याची मला खात्री आहे.
Also Read : प्राची तेहलानच्या आईला एक्कावन मालिकेतील ही गोष्ट आवडते