एक महानायक डॉ. बी. आर.आंबेडकरमध्ये अथर्व कर्वे, श्रावणी अभंग हे भीमराव व रमाबाईची भूमिका साकारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:35 PM2021-07-05T16:35:52+5:302021-07-05T16:43:26+5:30
डॉ. बी. आर. आंबेडकर हे सर्वोत्तम नेते होते आणि त्यांचा वारसा अद्वितीय आहे. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कोणाचेच नाही आणि समाजाप्रती त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. अशी प्रभावी भूमिका साकारणे मोठी जबाबदारी आहे आणि माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे.
वैविध्यपूर्ण व लक्षवेधक पटकथा व प्रतिभावान कलाकार असलेली एण्ड टीव्हीवरील मालिका 'एक महानायक डॉ. बी. आर. आम्बेडकर' झपाट्याने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे आणि अल्पावधीतच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. मालिकेने हिंदी जीईसीमध्ये पहिल्यांदाच भारताचे प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची अभूतपूर्व कथा सादर करत भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. २० जुलैपासून पटकथा नवीन वळण घेणार आहे, जेथे तरूण 'भीमराव आंबेडकर'ची भूमिका साकारण्याची अथर्व कर्वेची निवड करण्यात आली आहे आणि श्रावणी अभंग 'रमाबाई आंबेडकर'ची भूमिका साकारणार आहे. नवीन पिढी, नवीन शहर, नवीन विचार पण भेदभाव-असमानतेमध्ये काहीच बदल नाही. भीमराव असमानतेविरोधात संघर्ष सुरू करणार आहेत, तर मग तुम्ही या न्यायाच्या संघर्षामध्ये भीमरावांना पाठिंबा देणार का?
भीमराव आंबेडकरांची भूमिका साकारण्याबाबत अथर्व कर्वे म्हणाला, ''प्रेरणादायी नेते डॉ. बी. आर. आंबेडकर यांची भूमिका साकारण्यासाठी निवड होणे हा मोठा सन्मान आहे. माझी नेहमीच ही भूमिका साकारण्याचा आनंद घेण्याची इच्छा होती आणि माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. बाबासाहेबांचे जीवन व वारसा अनेकांसाठी प्रेरणास्रोत राहिले आहे. त्यांची प्रतिभा व यशस्वी कामगिरीची यादी अतुलनीय आहे. उत्तम विचारवंत, नेते, सामाजिक सुधारक, कट्टर राष्ट्रप्रेमी व अर्थशास्त्रज्ञ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार. डॉ. बी. आर. आंबेडकर हे सर्वोत्तम नेते होते आणि त्यांचा वारसा अद्वितीय आहे. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कोणाचेच नाही आणि समाजाप्रती त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. अशी प्रभावी भूमिका साकारणे मोठी जबाबदारी आहे आणि माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे.
डॉ. आंबेडकरांची पुस्तके व कार्यांनी मला खूप प्रेरित केले आहे. मी त्यांच्याबाबत खूप काही वाचत मोठा झालो आहे. मालिकेचा भाग असण्यासोबत डॉ. आंबेडकरांची भूमिका साकारायला मिळेल याबाबत मी कधीच विचार केला नव्हता. मी त्यांच्याबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे जीवन व वारसाबाबत वाचत आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणींबाबत प्रकाशित करण्यात आलेले विविध लेख, विविध लेखकांनी लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र यांचा संदर्भ घेण्यासोबत आम्ही प्रख्यात संशोधक देखील निवडले आहेत, जे मला डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्याबाबत खूप माहिती सांगत आहेत. वाचनासोबत मी मोकळ्या वेळेमध्ये त्यांच्यावर बनवण्यात आलेले विविध लघुपट देखील पाहण्याचा प्रयत्न करतो. मी या नवीन टप्प्याबाबत उत्सुक आहे आणि प्रेक्षकांनी मला भीमराव आंबेडकरांच्या भूमिकेत पाहण्यासाठी व स्विकारण्यासाठी देखील उत्सुक आहे.''
रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेत दिसण्यात येणारी श्रावणी अभंग म्हणाली, ''मी रमाबाईंची भूमिका साकारण्यासाठी निवडण्यात आल्याने स्वत:ला भाग्यवान समजते. ही प्रबळ भूमिका साकारण्याचा अनुभव अद्भुत आहे. रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक न्यायाचे द्योतक डॉ. भीमराव आंबेडकरांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणास्रोत राहिल्या आहेत. सर्वांना रमाबाईंबाबत खूपच कमी माहित आहे. म्हणूनच या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना त्यांच्याबाबत आणि त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनात बजावलेल्या भूमिकेबाबत माहित होईल. रमाबाई आंबेडकर या बाबासाहेबांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या नम्रता, प्रामाणिकपणा व करूणेच्या प्रतीक होत्या. रमाबाई आंबेडकर यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर काही आहे. मला ही भूमिका साकारण्याची आणि प्रेरणादायी मालिकेची भाग होण्याची ही संधी दिल्यामुळे खूपच सन्माननीय वाटत आहे.''