टेलिव्हिजनची ‘क्वीन’ एकता कपूर अडचणीत; इंदूरमध्ये चालणार खटला
By रूपाली मुधोळकर | Published: November 12, 2020 12:29 PM2020-11-12T12:29:40+5:302020-11-12T12:34:07+5:30
काय आहे प्रकरण?
टीव्हीची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी निर्माती, दिग्दर्शिका एकता कपूरला इंदूरच्या न्यायालयाने जोरदार झटका देत तिला दिलासा देण्यास नकार दिला आहे. आता एकताविरोधात मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये खटला चालणार आहे. वेबसीरिजद्वारे अश्लिलता पसरविणे आणि भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप करत एकताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी इंदूरमधील अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात एकता विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
इंदूर न्यायालयात दाखल एफआयआर रद्द करावी, अशी याचिका एकताने इंदूर हायकोर्टात केली होती. मात्र तिची ही विनंती न्यायालयाने धुडकावून लावली. तथापि एफआयआरमधील धार्मिक भावना भडकवण्यासाठी आणि राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करण्याचे कलम कमी करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
इंदूर येथील रहिवासी वाल्मीकि शकरगाए यांनी एकता कपूरविरोधात अन्नपूर्णा पोलिस ठाण्यात 5 जून 2020 रोजी तक्रार दिली. एकताच्या अॅल्ट बालाजीच्या ‘ट्रिपल एक्स’ वेब सीरिजमधून मोठ्या प्रमाणात अश्लीलता पसरवल्याचा आणि भारतीय सेनेचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वेबसीरिजमधील एका पुरूष पात्राने भारतीय लष्कराची वर्दी परिधान केली आहे आणि एक महिला पात्र ती वर्दी फाडते, असे दृश्य या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आले होते. या तक्रारीवर कारवाई करत पोलिसांनी एकताविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यात पोलिसांनी अश्लीलता, धार्मिक भावना भडकवण्याचे आणि राष्ट्रीय चिन्हाचा अवमान करण्याचे कलम लावले होते.
बिग बॉसचा 13 सीझन गाजवणारा हिंदुस्तानी भाऊ याने देखील याच वेबसीरिज संदर्भात एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊने केला होता.
एकता कपूर पुन्हा अडकली वादात, वेबसीरिजमधल्या 'त्या' सीनमुळे जमावाची घरावर दगडफेक