Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'; साईशाने सांगितल्या तृतीयपंथीयांच्या समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 17:02 IST2022-04-21T16:58:31+5:302022-04-21T17:02:19+5:30
Saisha shinde: अलिकडेच तिने ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात समाजाकडून कशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागते याविषयी भाष्य केलं आहे.

Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'; साईशाने सांगितल्या तृतीयपंथीयांच्या समस्या
अभिनेत्री कंगना रणौतचा लॉकअप (Lock Upp) हा शो सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला असून ट्रान्सवूमन साईशा शिंदे (Saisha Shinde) ही सर्वात स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळखली जात आहे. या शोमध्ये उत्तम टास्क खेळण्यासोबतच आपली मतं ठामपणे मांडण्यामुळे साईशा ओळखली जाते. मात्र, अलिकडेच तिने ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात समाजाकडून कशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागते याविषयी भाष्य केलं आहे.
सध्या या शोमध्ये तिकीट टू फिनाले टास्क रंगत आहे. या टास्कमध्ये प्रिंस नरुलाने (Prine Narula) साईशाला तृतीयपंथी समाजातील व्यक्तींना समाजात वावरतांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो यावर व्यक्त होण्यास सांगितलं. ज्यामुळे समाजात एक अवेअरनेस निर्माण होईल. यावर साईशाने तृतीयपंथी समाजाच्या समस्यांवर प्रकाश टाकला. यावेळी तिने सांगितलेल्या एका गोष्टीमुळे सगळेच जण शांत झाले.
"अनेकदा ट्रान्सजेंडर व्यक्तींना सर्वांसमक्ष कपडे उतरवून ते स्त्री आहेत की पुरुष याचा पुरावा द्यावा लागतो. त्यांच्याकडे ते स्त्री असल्याचा पुरावा मागितला जातो. एकतर त्यांचे कपडे उतरवले जातात किंवा त्यांचं सगळ्यांसमोर स्ट्रिप केलं जातं", असं साईशा म्हणाली.
साईशाचं हे वाक्य ऐकल्यावर प्रिंसने त्याच्या LGBTQI+ समुदायातील एका मित्राने सांगितलेल्या गोष्टीविषयी सांगितलं. ''लॉकअपमध्ये असलेला साईशा आमच्या कम्युनिटीला रिप्रेजेंट करत आहे. तू जेलमध्ये गेल्यावर तिला नक्की सांग की किन्नर समुदायाला काय काय सहन करावं लागतं हे सगळ्या जगासमोर आण'', असं प्रिन्स म्हणाला.
दरम्यान, लॉकअपमध्ये असलेली साईशा जर हा शो जिंकली तर त्यातून मिळणारी अर्धी रक्कम ती ट्रान्सजेंडर समुदायाच्या चांगल्या कामांसाठी दान करणार आहे, असा खुलासा तिने या कार्यक्रमात केला.