वयाच्या १५व्या वर्षी एकता कपूरला करायचं होतं लग्न, वडिलांमुळे कायमची राहिली अविवाहित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:53 IST2025-02-18T17:52:49+5:302025-02-18T17:53:27+5:30
Ekta Kapoor : एकता कपूर ही टेलिव्हिजनची राणी आहे. वर्षानुवर्षे ती अप्रतिम शोद्वारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.

वयाच्या १५व्या वर्षी एकता कपूरला करायचं होतं लग्न, वडिलांमुळे कायमची राहिली अविवाहित
एकता कपूर (Ekta Kapoor) ही टेलिव्हिजनची राणी आहे. वर्षानुवर्षे ती अप्रतिम शोद्वारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. एकताच्या सास-बहू नाटकापासून ते रोमँटिक मालिकेपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. एकता कपूर मातृत्वाचा आनंद घेत आहे. ती एका मुलाची आई आहे. सरोगसीच्या माध्यमातून एकता आई झाली. पण एकताने लग्न केले नाही.
एकता कपूर अजूनही व्हर्जिन आहे. पण तुम्हाला माहित आहे का की एक वेळ अशी होती जेव्हा एकताला वयाच्या १५ व्या वर्षी लग्न करायचे होते. न्यूज १८च्या रिपोर्टनुसार, एकताने सिंगल राहण्यामागचे कारण सांगितले होते. एकताने सांगितले होते की, अविवाहित राहण्याचा निर्णयामागे तिचे वडील जितेंद्र यांचा सल्ला होता. जितेंद्र यांनी एकताला दोन पर्यायांमधून निवड करण्यास सांगितले होते. जितेंद्र म्हणाले होते की, एकतर तिने लवकर लग्न करावे आणि तिला हवी तशी पार्टी करून आयुष्याचा आनंद लुटता येईल. दुसरा पर्याय म्हणजे तिने आपले काम समर्पणाने करणे. अशा परिस्थितीत एकताने काम करण्याचा पर्याय निवडला आणि लग्न केले नाही.
एकताबद्दल जितेंद्र म्हणाले...
एका मुलाखतीत जितेंद्र यांनी एकताच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, 'एकता मेहनती आणि उत्साही आहे. तिला कामाची आवड आहे, जी मला इतरांमध्ये दिसत नाही. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे. मी एकतासाठी खूप मेहनत घेतली आहे जेणेकरून तिला संघर्ष करावा लागू नये. पण तरीही एकताला संघर्ष करावा लागला. तिला सहज जीवन जगता आले असते. पण तिने तशी निवड केली नाही. प्रत्येकजण स्वतःचे नशीब, मेहनत आणि प्रतिभा घेऊन येतो.