'गंदी बात'मुळे वादात सापडलेल्या एकता कपूरनं ऑल्ट बालाजीचं प्रमुख पद सोडलं; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 05:06 PM2023-02-10T17:06:17+5:302023-02-10T17:06:48+5:30
स्मॉल स्क्रीन क्वीन एकता कपूरने नुकतीच तिच्या चाहत्यांसोबत एक धक्कादायक बातमी दिली आहे. जाणून घ्या नेमका काय आहे हे संपूर्ण प्रकरण..
स्मॉल स्क्रीन क्वीन एकता कपूरने नुकतीच तिच्या चाहत्यांसोबत एक धक्कादायक बातमी दिली आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांनी 2017 मध्ये लाँच केलेल्या त्यांच्या OTT प्लॅटफॉर्म Alt Balaji चे नेतृत्व सोडले आहे. त्याची जबाबदारी नव्या टीमकडे सोपवण्यात आली आहे, जी आता सर्व कामकाज पाहणार आहे. एकताने पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
2017 मध्ये लॉन्च केलेले, Alt Balaji चा कंटेंट बाकीच्या प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे होता आणि त्यामुळेच ते अनेकदा चर्चेत होता. Alt Balajiवरील 'गंदी बात' या मालिकेचा वाद कोर्टापर्यंत पोहोचला होता. त्याचबरोबर 'लॉकअप' सारख्या रिअॅलिटी शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज एकताने OTT प्लॅटफॉर्मच्या व्यवस्थापनातील बदलाविषयी माहिती दिली आणि Instagram वर एक पोस्ट शेअर करून नवीन टीमचे स्वागत केले.
एकताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की आज अधिकृतपणे एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी ऑल्ट बालाजी कंपनीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. ALTBalaji आता नवीन टीम आहे. इतर उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकताने हा निर्णय घेतला आहे.
तिने पोस्टमध्ये असेही सांगितले की, आता विवेक कोका हे या OTT प्लॅटफॉर्मचे नवे मुख्य व्यवसाय अधिकारी असतील. पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'विवेक कोका हे Alt बालाजीचे नवीन मुख्य व्यवसाय अधिकारी असल्याची घोषणा करताना कंपनीला आनंद होत आहे.