आध्विक महाजन आहे फिटनेस फ्रिक अभिनेता,फिट राहण्यासाठी जिमपेक्षा देतो या गोष्टीला प्राधान्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 08:00 AM2019-04-29T08:00:00+5:302019-04-29T08:00:00+5:30
रोजचा व्यायाम कंटाळवाणा होऊ नये आणि त्यात तोचतोचपणा येऊ नये म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. तासन तास सुरू असलेल्या शूटिंगमधून वेळ काढत व्याया कऱणे हे तितकेसे सोपे नाही.
‘दिव्य दृष्टी’ मालिकेत भूमिका साकारत असलेला अभिनेता आध्विक महाजनने आपला अप्रतिम अभिनय आणि भरदार व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत आध्विक रक्षित शेरगिल या धूर्त धनाढ्य उद्योगपतीची भूमिका साकारत असून दिव्या आणि दृष्टी या बहिणींना एकत्र आणण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याने दृष्टीशी विवाह केलेला आहे.
रक्षित हा आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. भूमिकेप्रमाणे स्वत: आध्विकही वैयक्तिक जीवनात तंदुरुस्तीबद्दल विशेष जागरूक असून तो काहीही झाले तरी आपला रोजचा व्यायाम चुकवत नाही. त्याच्या या नियमित आणि काटेकोर व्यायामामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या मेहननतीमुळेच पीळदार शरीरयष्टीमुळे त्याच्यावर फिदा आहेत.
व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे हा बहुतेकांसाठी पर्याय असला, तरी त्यापेक्षा वेगळ्या तर््हेने व्यायाम करण्यास फारसे कोणी उत्सुक नसते. पण मार्शल आर्टसचा जबरदस्त चाहता असलेला आध्विक महाजन म्हणतो, “गेली जवळपास 10 वर्षं मी मार्शल आर्टसचा सराव करत आहे. व्यायामशाळेतील नियमित व्यायामाबरोबरच मार्शल आर्टसचा सराव हा माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. मार्शल आर्टसमध्ये मी मिक्स्ड मार्शल आर्टस, जिम्नॅस्टिक्स, फ्री हॅण्ड टेक्निक्स, नून चक्स असे वेगवेगळे प्रकार करतो त्यामुळे मार्शल आर्टसचा माझा सराव फार उत्साहित करणारा ठरतो.
रोजचा व्यायाम कंटाळवाणा होऊ नये आणि त्यात तोचतोचपणा येऊ नये म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. तासन तास सुरू असलेल्या शूटिंगमधून वेळ काढत व्याया कऱणे हे तितकेसे सोपे नाही. तुमच्या अशा फिट शरीयष्टीवर तुमचे चाहते खुश होतात, तेव्हा असं शरीर राखण्यासाठी मी केलेली मेहनत सार्थकी लागते, असं मला वाटतं. मी दररोज नियमित आणि काटेकोर व्यायाम करण्यावर भर देतो. त्यात मी एक दिवसाचाही व्यत्यय येऊ देत नाही.
आध्विक महाजनकडील मार्शल आर्टसचे कौशल्यच त्याला सर्व प्रकारच्या समस्यांपासून दूर ठेवते कारण मार्शल आर्टस हा स्वसंरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्या दैनंदिन जीवनात तंदुरुस्त राहण्याचा संदेश देताना आजच्या पिढीतील कलाकारांना पाहून सर्वच प्रेक्षक आणि त्यांच्या चाहत्यांना योग्य ती प्रेरणा मिळेल, यात शंका नाही!