एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या! राहुलने रेव्ह पार्टीची दिली कबुली, ऑडिओ क्लिपमध्ये सापांसाठी वाटाघाटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 12:51 PM2023-11-05T12:51:22+5:302023-11-05T13:09:40+5:30

एल्विश यादव प्रकरणी पोलिसांना आणखी दोन ऑडियो क्लिप मिळाल्या आहेत.

Elvish Yadav's problems increased! Rahul confesses to rave party, bargain for snakes in audio clip | एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या! राहुलने रेव्ह पार्टीची दिली कबुली, ऑडिओ क्लिपमध्ये सापांसाठी वाटाघाटी

एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या! राहुलने रेव्ह पार्टीची दिली कबुली, ऑडिओ क्लिपमध्ये सापांसाठी वाटाघाटी

बिग बॉस OTT 2 चा विजेता आणि प्रसिद्ध YouTuber एल्विश यादव सध्या अडचणीत सापडला आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याप्रकरणी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एल्विशने हे आरोप फेटाळाले आहेत. आता या प्रकरणी एक ऑडियो क्लिप समोर आली आहे, यामुळे एल्विशच्या अडचणी वाढल्या आहेत. यात रेव्ह पार्टीचा एजंट राहुल यादव फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. ऑडिओमध्ये तो ज्या व्यक्तीसोबत बोलत आहे, त्या संभाषणात सापाचे विष, रेव्ह पार्टी आणि एल्विश यादव यांचा उल्लेख वारंवार केला जात असल्याचे समोर आले आहे.

एका फोनमुळे एल्विश यादव अडकला! सापाच्या विषासह रेव्ह पार्टीवर पोलिसांचा मोठा खुलासा

मनेका गांधींच्या एनजीओ पीपल्स फॉर अॅनिमल्सने साप तस्करांविरोधात सापळा रचला होता. पीएफए ​​टीम राहुल यादव नावाच्या व्यक्तीशी अनेक दिवस बोलत होती. या संभाषणात पीएफए ​​टीमला साप आणि सापाच्या विषाच्या तस्करीचे पुरावे मिळाले. या स्टिंग ऑपरेशन दरम्यान राहुलने एल्विश यादवच्या पार्ट्यांमध्ये अनेकदा विष वापरल्याचा उल्लेख केला.

पीएफए ​​सदस्याने एल्विश यादव याच्या पार्टीचा उल्लेख केला तेव्हा राहुल म्हणाला- मी तो कार्यक्रम केला होता, पण ते सोडून परतलो होतो. तिथे फक्त परदेशीच होते, ती परदेशीची बर्थडे पार्टी होती. त्या पार्टीचे आयोजन दिल्लीतील छतरपूरमध्ये करण्यात आले होते. राहुलने याला रेव्ह पार्टी म्हटले आणि असा दावा केला की ते असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परदेशातही जातात. १५ वर्षांपासून ते हे काम करत आहेत. ऑडिओमध्ये राहुलने असेही म्हटले आहे की, त्याच्याकडे अनेक प्रकारचे कोब्रा साप आहेत आणि अशा पार्ट्या नोएडामध्येही आयोजित केल्या जातात. राहुलच्या म्हणण्यानुसार ही पार्टी  एल्विश यादव याच्याच आहेत.

पीएफएने पोलिसांना दुसरी ऑडिओ क्लिप दिली, यात राहुलने एल्विशच्या पार्ट्यांमध्ये कसं चेकिंग केलं जात नाही हे सांगितलं. राहुल म्हणाला- दिल्लीत खूप चेकिंग आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते. आमच्याकडे सर्व प्रकारचे साप आहेत. सर्वांचे विष काढून टाकले आहे, आमच्याकडे अजगर, काळा नाग, लहान नाग असतात. यासोबतच राहुलने सांगितले की, आता तो मोबाईलमध्ये फोटो घेऊन फिरत नाही, कारण चेकिंग केले तर पकडले जाते. भरपूर सुरक्षा आहे. दिल्लीत वन विभागाचे लोक आणि पोलीस त्यांना पकडून घेऊन जातात.

यानंतर पीएफए ​​सदस्याने विचारले - एल्विसच्या ठिकाणी तुम्ही जे करता ते तुम्ही कसे घेता? राहुलने सांगितले - काय आहे, त्यांचा कार्यक्रम परदेशी लोकांसाठी आहे, जो त्यांचा एजंट बुक करतो, एल्विशच्या ठिकाणी पोलिसही येत नाहीत, त्याचे कॉन्टक्ट मोठे आहेत. जेव्हा आम्ही छतरपूरला कार्यक्रम करायला जातो तेव्हा तिथल्या सगळ्यांना कळते की त्यांच्या फार्म हाऊसवर कार्यक्रम आयोजित केला जात आहे. पण जास्त वेळ लागत नाही, फक्त अर्धा तास. त्यानंतर ते आधी आमच्या टीमला तिथून बाहेर काढतात. 

Web Title: Elvish Yadav's problems increased! Rahul confesses to rave party, bargain for snakes in audio clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.