नेहा पेंडसेवर चढला इंग्लिश गाण्याचा फिव्हर; व्हिडीओत दिसल्या अभिनेत्रीच्या हॉट मूव्ह्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 16:06 IST2022-01-28T15:12:26+5:302022-01-28T16:06:20+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.

नेहा पेंडसेवर चढला इंग्लिश गाण्याचा फिव्हर; व्हिडीओत दिसल्या अभिनेत्रीच्या हॉट मूव्ह्ज
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सध्या ती लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर हैं'(Bhabhi Ji Ghar Par Hain)मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारताना दिसत आहे. नेहा पेंडसेने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यात ती एका इंग्रजी गाण्यावर थिरकताना दिसतेय. या गाण्यातील तिचे डान्स मूव्ह्ज पाहुन चाहते क्रेझी झालेत.
‘I really like to party’ या गाण्यावर नेहा व्हिडीओ तयार केला आहे. यात तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यावर पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. नेहाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
२०२० मध्ये नेहाची 'भाबीजी घर पर हैं' मध्ये अनिता भाभीच्या भूमिकेत सौम्या टंडनच्या जागी वर्णी लागली. ती जानेवारी २०२१ मध्ये मालिकेत सामील झाली. सौम्याने शोचा निरोप घेतला होता. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधला असला, तरी अखेर नेहाला फायनल करण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये नेहाने एका मुलाखतीत सांगितले की सौम्या नंतर प्रेक्षकांनी तिचे अपेक्षेप्रमाणे स्वागत केले नाही. पुढे तिचे काम चाहत्यांना आवडू लागले.