​मीरा जोशीची 'कुलस्वामिनी' मालिकेमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 05:20 AM2017-11-09T05:20:07+5:302017-11-09T10:50:07+5:30

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय 'कुलस्वामिनी' या मालिकेतील आरोही आणि राजस यांचं नातं त्यांच्याविरोधात होणाऱ्या कारस्थानांना तोंड देत तावून सुलाखून निघत ...

Entry in Mira Joshi's 'Kalswamini' series | ​मीरा जोशीची 'कुलस्वामिनी' मालिकेमध्ये एंट्री

​मीरा जोशीची 'कुलस्वामिनी' मालिकेमध्ये एंट्री

googlenewsNext
टार प्रवाहवरील लोकप्रिय 'कुलस्वामिनी' या मालिकेतील आरोही आणि राजस यांचं नातं त्यांच्याविरोधात होणाऱ्या कारस्थानांना तोंड देत तावून सुलाखून निघत आहे. आता पुन्हा या नात्यात दुरावा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अभयची गर्लफ्रेंड असलेली पावनी या मालिकेत एंट्री घेत आहे. अभिनेत्री मीरा जोशी पावनीची भूमिका साकारणार आहे. या नव्या एंट्रीने कुलस्वामिनी या मालिकेत नवे आणि रंगतदार वळण येणार आहे.
राजस आणि आरोही यांच्यातल्या नात्याने सुवर्णा काकू अस्वस्थ आहे. काकूला या दोघांचा काटा काढायचा आहे. मात्र, कितीही कारस्थाने केली, तरी त्यात ती पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. रेणुका देवीच्या कृपेने अभय बरा झाला आहे. त्याला समजले आहे  की, खरं तर राजस आणि आरोहीचं लग्न झाले आहे. म्हणून आरोहीपासून दूर जाण्यासाठी अभय स्वतःला व्यवसायात गुंतवून घेत आहे. त्या दरम्यान त्याची पावनी सोबत भेट झाली आहे. आता काही काळाने पावनी अभयची गर्लफ्रेंड असल्याचे सांगत देवधर कुटुंबात प्रवेश करणार आहे. पावनीच्या देवधर कुटुंबातील प्रवेशामागे अभयचा काही डाव आहे का, पावनी राजस आणि आरोहीच्या नात्यात काही दुरावा आणणार का, असे अनेक अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना पुढील काळात मिळणार आहेत.
आपल्या विरोधात होत असलेल्या कारस्थानांना आरोही कशा पद्धतीने सामोरी जाते, रेणुका देवी आरोहीला कशा प्रकारे साहाय्य करते, पावनीच्या येण्यानंतरही तिचे आणि राजसचे नाते कायम टिकून राहणार का हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
कुलस्वामिनी ही नवी मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरू लागली आहे. रेणुका मातेची महती सांगताना आस्तिक नास्तिकतेचा संघर्ष या मालिकेतून दाखवला जात आहे. या मालिकेत संग्राम साळवी राजस देवधर ही भूमिका साकारतो आहे. राजसच्या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहे. लहानपणीच त्याची आई गेली. वडिलांशी त्याचे कधी पटलेच नाही आणि वडिलांनी त्याला कधी समजूनही घेतले नाही. त्यामुळे वडिलांच्या मनाविरूद्ध तो नेहमी वागतो. मात्र, त्याच्या मनात मायेचा ओलावाही आहे. संग्रामला 'राजस बोलला, विषय संपला' असा खणखणीत संवाद मिळाल्यामुळे या व्यक्तिरेखेला अजून आयाम मिळाले आहेत.मालिकेचे लेखक शिरीष लाटकर सांगतात, 'राजस ही व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड आवडत आहे. प्रत्येक गोष्टीला तो थेट भिडणारा आहे. त्याच्या मनात एक आणि ओठावर एक असे काहीही नाही. त्यामुळे त्याच्या व्यक्तिरेखेसाठी काहीतरी तकिया कलाम असावा असे वाटत होते. त्यातूनच 'राजस बोलला, विषय संपला' हा संवाद सुचला. या संवादाने ही व्यक्तिरेखा अजून उठावदार झाली आहे. संग्रामने त्याच्या खास शैलीत ही व्यक्तिरेखा अधिक फुलवली आहे.'

Also Read : ​का रडतोय कुलस्वामिनी फेम संग्राम साळवी?

Web Title: Entry in Mira Joshi's 'Kalswamini' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.