स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:23 PM2024-04-01T12:23:30+5:302024-04-01T12:23:46+5:30

अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) लवकरच 'सुख कळले' (Sukh Kalale Serial) या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. कलर्स मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Entry of the 'Majhi Tuzhi Reshimgath' fame actress in Spruha Joshi's 'Sukh Kalle' serial | स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) लवकरच 'सुख कळले' (Sukh Kalale Serial) या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. कलर्स मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची मालिकेबाबतची उत्सुकता वाढली आहे. २२ एप्रिलपासून ही मालिका भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये स्पृहा जोशीसोबत अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान आता या मालिकेमध्ये माझी तुझी रेशीमगाठ फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ फेम अभिनेत्री स्वाती देवल सुख कळले या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेमध्ये स्वातीसोबत तिचा मुलगा स्वाराध्य देखील एन्ट्री करतो आहे. स्वातीने सोशल मीडिया अकाऊंवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. तिने मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले की, नमस्कार मंडळी....तुम्ही माझी तुझी रेशीमगाठमध्ये मला भरभरून प्रेम दिले, राणी मी होणारंच्या कांतावरही करताय... आता पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येते आहे..नवीन भूमिकेतून माझ्या स्वाराध्यला घेउन, नव्या टीम सोबत...नक्की बघा "सुख कळले" आपल्या कलर्स मराठीवर... लवकरच

सुख कळले मालिकेमधील कलाकारांची नावं समोर येत आहेत. स्पृहा जोशी, सागर देशमुख आणि बालकलाकार मिमी खडसे या कलाकारांनंतर आता स्वाती देवल आणि तिच्या मुलगा देखील या मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

Web Title: Entry of the 'Majhi Tuzhi Reshimgath' fame actress in Spruha Joshi's 'Sukh Kalle' serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.