"मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही", जेव्हा शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 06:35 PM2021-12-23T18:35:07+5:302021-12-23T18:35:58+5:30

kapil Sharma Show शिबानी आणि (Shibani Dandekar) कपिल शर्मा या दोघांचा मराठी भाषेवरुन झालेले संवादाने उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते,हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा शिबानीचं कौतुक करत आहेत.

Even Shibani Dandekar had scold Kapil Sharma for not speaking Marathi, check what she said? | "मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही", जेव्हा शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला सुनावलं

"मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही", जेव्हा शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला सुनावलं

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'कपिल शर्मा शो' (kapil Sharma Show) हा घराघरात प्रसिद्ध आहे. आपल्या सिनेमाचे म्हणा किंवा अन्य काही प्रोजेक्टचे प्रमोशन करण्यासाठी सेलिब्रेटी मंडळी कपिल शर्मा शोमध्ये आवर्जुन हजेरी लावत असतात. सेलिब्रेटीसुद्धा या शोमध्ये हजेरी लावण्यासाठी खूप उत्सुक असतात. कपिल शर्मा आपल्या स्टाईलने आलेल्या पाहुण्यांची नेहमी शाळा घेत असतो. मात्र यावेळी काहीसं उलटं झालं. नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये रवी किशन (Ravi Kishan), सचिन खेडेकर (Sachin khedekar) आणि सोनाली कुलकर्णी यांनी हजेरी लावली. यावेळी नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी अंदाजात कॉमेडीयन कपिल शर्माने त्यांचे स्टेजवर स्वागत केले. यावेळी कपिल शर्मानेही या तिघांबरोबर गप्पा मारायला सुरुवात केली. त्यावेळी अचानक सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) कपिल शर्माची मराठीत बोलत नसल्यावरुन त्याची फिरकी घेतली.मुंबईत राहतोस आणि मराठीत बोलत नाहीस असे म्हटल्यावर कपिल शर्मानेही त्याच्या खास अंदाजात सोनालीलाही उत्तर देताना दिसला.

अगदी असेच काहीसे प्रश्न शिबानी दांडेकरनेही कपिल शर्माला त्याच्या शोमध्ये विचारले होते.सोनाक्षी सिन्हासह(Sonaskshi Sinha) शिबानी दांडेकरने शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शिबानीनेही मराठमोळ्या अंदाजात कपिल शर्माची फिरकी घ्यायला सुरुवात केली.''मला मराठी येतं, तुला मराठी येतं का? इंग्लिश बोलते मी, हिंदी बोलते आणि मराठीसुद्धा बोलते.मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही.

मराठी भाषेबद्दल असलेले शिबानीचं प्रेम या व्हिडीओतून पाहायला मिळालं. तसेच तिने शोमध्ये लावणीही सादर केली. सोशल मीडियावरही या व्हिडिओने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. विनोदी ढंगातला व्हिडीओ असला तरी चाहते मात्र यावर संमिश्र प्रतिक्रीया देतान दिसत आहे. 


तसंच शिबानीचा अंदाज पाहून चाहते तिचं भरभरुन कौतुक करत आहेत. शिबानी आणि कपिल शर्मा या दोघांचा मराठी भाषेवरुन झालेले संवादाने उपस्थितही हसून हसून लोटपोट होत होते,हा व्हिडीओ पाहून चाहतेसुद्धा शिबानीचं कौतुक करत आहेत. शिबानी मराठी बोलता आलंच पाहिजे हे कपिल शर्माला सांगताना दिसते. यावर कपिल शर्माला मात्र काय बोलावे काही सुचेनासेच झाल्याचे पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


 

Web Title: Even Shibani Dandekar had scold Kapil Sharma for not speaking Marathi, check what she said?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.