घटस्फोटानंतर राजीव सेन-चारू असोपाचे झाले पॅचअप ? एका कमेंटमुळे चाहत्यांचा उडालाय गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 01:46 PM2023-07-03T13:46:33+5:302023-07-03T13:57:55+5:30
अलीकडेच चारू असोपाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता.
चारू असोपा आणि राजीव सेन यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. दोघे आता मुलगी जियानाची एकत्र मिळून जबाबदारी संभाळतायेत. या सगळ्यामध्ये, घटस्फोटानंतरही चारू आणि राजीव कधी कॉफी डेटवर स्पॉट होतात तर कधी आउटिंग करताना दिसतात. त्यामुळे चाहतेही त्यांच्या नात्याबद्दल संभ्रमात पडले आहेत. आता राजीवने चारूच्या फोटोवर कमेंट करून चाहत्यांचा संभ्रम आणखी वाढवला आहे.
राजीवने केली कमेंट
अलीकडेच चारू असोपाने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये चारू गुलाबी रंगाची जॉर्जेट साडी परिधान केलेली दिसत आहे. यासोबतच व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सोनू निगम आणि सुनिधी चौहानचा 'देखो ना' हा रोमँटिक ट्रॅक लावला होता. अभिनेत्रीचा एक माजी पती राजीव सेनही तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राजीवने चारुच्या या व्हिडीओवर "अती सुंदर" अशी कमेंट केली आहे.
चारूच्या व्हिडीओवर राजीवने केलेल्या कमेंटमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी दोघांना पुन्हा एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे.
चारू असोपा आणि राजीव सेन यांचे २०१९ मध्ये लग्न झाले. या लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये मतभेद झाले आणि राजीवने चारूची साथ सोडली. दोघांनी आपले नाते सुधारले आणि काही काळानंतर मुलगी जियाना त्यांच्या आयुष्यात आली, पण आता पुन्हा ते कायमचे वेगळे झाले आहेत. राजीव यांची मुलगी जियाना तिची आई चारूसोबत राहते. घटस्फोटापूर्वी राजीव आणि चारू यांनी एकमेकांवर गंभीर आरोपही लावले होते. राजीवने सांगितले की चारूने तिचे पहिले लग्न त्याच्यापासून लपवले होते. तर चारूने सांगितले होते की, राजीव तिच्यावर अनेकदा संशय घेत असे. आता दोघांमधील कटुता संपली आहे.