'पारू' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, अनुष्कामुळे आदित्य आणि पारूच्या मैत्रीत येतोय दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 02:35 PM2024-12-03T14:35:13+5:302024-12-03T14:35:46+5:30
Paru Serial :'पारू' मालिकेत अनुष्काच्या एन्ट्री नंतर आदित्य आणि पारूच्या मैत्रीत दुरावा निर्माण झालाय. आता तर अनुष्का आदित्यसाठी डेट नाईट प्लॅन करत आहे. ज्याची तयारी तिने पारूला करायला सांगितली आहे.
'पारू' मालिकेत (Paru Serial ) अनुष्काच्या एन्ट्री नंतर आदित्य आणि पारूच्या मैत्रीत दुरावा निर्माण झालाय. आता तर अनुष्का आदित्यसाठी डेट नाईट प्लॅन करत आहे. ज्याची तयारी तिने पारूला करायला सांगितली आहे. अनुष्का, तिची योजना यशस्वी झाल्यानंतर, दिशाला भेटायला जाते. इथे तिचं दिशासोबतचं नातं उलगडतं आणि तिचा किर्लोस्कर कुटुंबामध्ये येण्यामागचा खरा उद्देश स्पष्ट होतो.
अनुष्का आता किर्लोस्कर कुटुंबाचा भाग बनू पहातेय, तर पारूअंतर आदित्य आणि संपूर्ण कुटुंबापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करतेय. दरम्यान, आदित्यला उद्योग क्षेत्रातील विशेष पुरस्कार जाहीर झालाय, यामुळे पारू खूप आनंदात आहे. मात्र, जेव्हा ती आदित्यला शुभेच्छा देण्यासाठी जाते, तेव्हा आदित्य आणि अनुष्काला एकत्र पाहून ती निराश होते. दुसरीकडे, दमिनी मारुतीला सांगतेय की गरीब मुली श्रीमंत मुलांना कसे फसवतात, त्यामुळे ती मारुतीला पारूला किर्लोस्कर कुटुंबापासून दूर ठेवण्याचा सल्ला देते. पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी पारू आदित्यची बॅग पॅक करते, तेव्हाच ती त्याच्या जॅकेटचा उबदारपणा अनुभवायचा प्रयत्न करते. अनुष्का हे सर्व पाहते आणि खूप संतापते.
अनुष्का पारूच्या वागणुकीमुळे चिडते आणि तिचा बदला घेण्याचा मार्ग शोधते. ती आदित्यला पारूला फक्त नोकर म्हणायला लावते. हे ऐकून पारू खूप दुःखी होते. त्यामुळे पारू आदित्यपासून आणि किर्लोस्कर कुटुंबापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेते. याच दरम्यान प्रीतम जाहीर करतो की आदित्य आणि पारूला एका जाहिरातीसाठी एकत्र काम करावे लागेल, ज्यामध्ये गावात जाऊन प्रमोशनल व्हिडिओ शूट करणं अपेक्षित आहे. सर्वजण यासाठी सहमती देतात, पण पारू नकार देते. दामिनीच्या धमकीमुळे मारुतीही पारूला या शूटसाठी पाठवण्यास नकार देतो आणि तिला किर्लोस्कर कुटुंबापासून दूर ठेवतो. पारूच्या या वागण्यामागचं खरं कारण आदित्यला कळले ? आपल्या प्लॅनमध्ये अनुष्का यशस्वी होईल का? हे पाहणे कमालीचे ठरेल.