Khushboo Tawde Exclusive : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतून खुशबू तावडे पडली बाहेर, तिच्याजागी दिसणार ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:12 IST2024-08-09T16:11:36+5:302024-08-09T16:12:40+5:30
Sara Kahi Tichyasathi : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी'. या मालिकेतील खोत कुटुंबाने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. दरम्यान आता या मालिकेतून अभिनेत्री खुशबू तावडे बाहेर पडली आहे.

Khushboo Tawde Exclusive : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतून खुशबू तावडे पडली बाहेर, तिच्याजागी दिसणार ही अभिनेत्री
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi). या मालिकेतील खोत कुटुंबाने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. उमाई आणि दादा खोत यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे रसिकांच्या घरातील सदस्य बनले आहेत. दरम्यान आता या मालिकेतून अभिनेत्री खुशबू तावडे (Khushboo Tawde) बाहेर पडली आहे. ती लवकरच आई होणार असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला आहे. मालिकेत तिच्या जागी आता कोण दिसणार, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर सूत्रांच्या माहितीनुसार, तिच्या जागी अभिनेत्री पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) हिची वर्णी लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सारं काही तिच्यासाठी मालिकेत उमाईच्या भूमिकेत खुशबू तावडेच्या जागी आता पल्लवी वैद्य पाहायला मिळणार आहे. तिने शूटिंगलाही सुरूवात केल्याचे समजते आहे. खुशबू प्रेग्नेंट असून ती दुसऱ्यांचा आई होणार आहे. त्यामुळे आता तिने शूटिंग थांबवले असून मालिकेतून एक्झिट घेतली आहे.
खुशबू तावडे दुसऱ्यांदा होणार आई
अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांना ३ वर्षांचा मुलगा आहे. ज्याचं नाव आहे राघव. त्यानंतर आता या जोडप्यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी ते दोघे खूप उत्सुक आहेत. संग्राम आणि खुशबूने २०१८ साली लग्नगाठ बांधली.
पल्लवी वैद्यबद्दल...
पल्लवीने ‘अग्गंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून तिने काही काळ प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले. ‘अजुनही बरसात आहे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिने काम केले आहे. तसेच गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातही तिने काम केले आहे. शेवटची ती तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करताना दिसली होती.