‘नजर’ मालिकेमध्ये नियती फटनाणी बनणार नागिण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 11:58 AM2018-12-03T11:58:38+5:302018-12-03T11:59:26+5:30

सर्पिकाच्या प्रवेशामुळे मालिकेत आता आणखी काही नवी रहस्य उलगडणार आहेत. त्यामुळे मालिका अधिकच रंजक होणार आहे असे दिसते.

The 'eye' series will be a trickle! | ‘नजर’ मालिकेमध्ये नियती फटनाणी बनणार नागिण!

‘नजर’ मालिकेमध्ये नियती फटनाणी बनणार नागिण!

googlenewsNext

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिकेतील विविध व्यक्तिरेखा आणि त्यांच्या भयंकर अवतारांमुळे आगामी भागांमध्ये कथानकात भीती आणि थरारकतेचा नवा अनुभव प्रेक्षकांना देत असल्याचे पाहायला मिळत आहे.  लवकरच या मालिकेत सर्पिका नावाच्या एका नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार असून त्यामुळे प्रेक्षकांना एक अनपेक्षित आश्चर्याचा धक्का बसणार आहे. मोहनाच्या करामतींमुळे पिया आपल्या दैविक शक्ती गमावून बसते आणि ती सर्पिका बनते. सर्पिकेची ही भूमिका रंगविण्यासाठी नियती फटनाणी अधिक मेहनत घेतली आहे.

नियती म्हणाली, “या मालिकेत मला सर्पिकाची भूमिका रंगवावी लागणार आहे, हे जेव्हा मला कळलं, तेव्हा माझ्या व्यक्तिरेखेला हे अनपेक्षित वळण लागत असल्याचं पाहून मी खूपच खुश झाले होते. मी आजपर्यंत टीव्हीच्या पडद्यावर इतकी भयंकर आणि भूमिका साकारलेली नाही. सध्या मी दैविक पियाची भूमिका  साकारत असले, तरी सर्पिकेची व्यक्तिरेखा ही तिच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. अशी भूमिका प्रेक्षकांना आजपर्यंत टीव्हीवर पाहायलाच मिळालेली नाही. सर्पिकाचे केस म्हणजे विविध साप असून तिच्या शरीराचा कमरेखालचा भाग हा नागिणीसारखा आहे. ही व्यक्तिरेखा उभी करणं हे जितकं आव्हानात्मक आहे, तितकंच ते औत्सुक्यपूर्णही आहे. मला या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा आहे.”

सर्पिकाच्या प्रवेशामुळे मालिकेत आता आणखी काही नवी रहस्य उलगडणार आहेत. त्यामुळे मालिका अधिकच रंजक होणार आहे असे दिसते. 'नजर' या मालिकेतील तरूण डायन रूबीवर नजर टाकल्यास तिचे ग्लॅमरस आणि मादक रूप नक्कीच तुमच्या नजरेत भरल्याशिवाय राहणार नाही. वेशभूषेबरोबरच अंगावरील विविध आभूषणे यांची निवड कधी कधी सोन्या स्वत:च करीत असते. 
'नजर'मधील सर्व कलाकारांमध्ये  सोन्या या अभिनेत्रीची वेशभूषा ही सर्वांत फॅशनेबल आहे. ती बरेचदा काही अफलातून शैलीदार कपड्यांत वावरताना दिसते. याबाबत सोन्या म्हणाली की, “मी साकार करीत असलेल्या रूबीच्या व्यक्तिरेखेला स्टाईल आणि फॅशन यांची उत्तम जाण असून ती अनेकदा अतिशय फॅशनेबल कपडे आणि आभूषणे परिधान करीत असते. 

Web Title: The 'eye' series will be a trickle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.