'वारिस'च्या सेटवर फरनाजला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 07:11 AM2017-04-11T07:11:57+5:302017-04-11T12:41:57+5:30

नुकताच वारिसच्या सेटवर अभिनेत्री फरनाज  शेट्टीचा अपघात झाला. मालिकेतील एका भागाच्या सीक्वेन्ससाठी शूटिंग करत असताना तिचा हात भाजला होता.असे ...

Fahanaj was hurt on the heir's set | 'वारिस'च्या सेटवर फरनाजला झाली दुखापत

'वारिस'च्या सेटवर फरनाजला झाली दुखापत

googlenewsNext
कताच वारिसच्या सेटवर अभिनेत्री फरनाज  शेट्टीचा अपघात झाला. मालिकेतील एका भागाच्या सीक्वेन्ससाठी शूटिंग करत असताना तिचा हात भाजला होता.असे घडले की, मालिकेमधील मुख्य जोडी फरनाज आणि नील मोटवानी हे दोघे फायर सीक्वेन्ससाठी शूटिंग करत होते.जेथे अखेर  मनूची खरी ओळख राजवीर समोर उघडकीस होते.ड्रामाटीक सीक्वेन्समध्ये  मनू आग लागलेल्या खोलीमध्ये अडकलेल्या राजवीरच्या आईला वाचवते.ज्या करिता कपडा म्हणून ती तिच्या पगडीचा उपयोग करते जशी ती पगडी काढते तसचे रावीरला समजते की मनू हीच प्रीत आहे हे पाहून त्याला धक्काच बसतो.सीक्वेन्सबाबत बोलताना  फरनाज शेट्टी म्हणाली,सीक्वेन्सच्या मागणीनुसार मला आगीमधून बाहेर पडण्याकरिता  माझ्या पगडीचा वापर करायचा होता, पण सीनचे शूटिंग करताना माझा हात भाजला.त्वरीत मला हॉस्पिलमध्ये नेण्यात आले.देवाच्या कृपेने जास्त गंभीर इजा झाली नाही त्यामुळे देवाचे आभार मानावे तितके कमीच आहे.सध्या हातावर उपचार सुरू असून आता मी बरी आहे.लवकरात लवकर शूटिंगला सुरूवात करेन असेही तिने सांगितले.फेब्रुवारी महिन्यातच मालिकेने 10 वर्षांचा लीप घेताल होता. त्यानुसार फरनाजची एंट्री करण्यात आली होती.फरनाज या मालिकेत मनूची भूमिका साकारत आहे.या मालिकेत ती एका पंजाबी मुलाच्या लूकप्रमाणे  तिचा लूक केला आहे.मालिकेच्या लीपनंतर एका प्रोमोच्या शूटिंगवेळीही फरनाजचा अपघात झाला होता.या प्रोमोचे शूटिंगवेळी फरनाजला घोड्यावर बसायचे होते. पण आजूबाजूला खूप ढोल ताशे वाजत असल्याने या आवाजामुळे घोडा चवथळला आणि त्याने फरनाझच्या पायावर अनेकवेळा पाय दिला.खरे तर तिच्या पायाला आधीपासूनच लागले असल्यामुळे तिला खूपच त्रास होत होता. पण त्या अवस्थेतही तिने घोड्याला शांत केले आणि ते शूटिंग पूर्ण केले.  

Web Title: Fahanaj was hurt on the heir's set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.