श्वेता तिवारी १० वर्षांनी लहान को स्टारला करतेय डेट? अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 01:11 PM2024-07-22T13:11:26+5:302024-07-22T13:12:49+5:30

फिल्मी करिअरपेक्षा श्वेता जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. ४३ वर्षीय श्वेताचं नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे. यावर अभिनेत्याने अखेर मौन सोडलं आहे.

fahman khan break silence on dating shweta tiwari relationship rumours | श्वेता तिवारी १० वर्षांनी लहान को स्टारला करतेय डेट? अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला...

श्वेता तिवारी १० वर्षांनी लहान को स्टारला करतेय डेट? अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला...

अभिनेत्री श्वेता तिवारी हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. श्वेताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, फिल्मी करिअरपेक्षा श्वेता जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. ४३ वर्षीय श्वेता तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. सध्या अभिनेत्रीचं नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे. 'इमली' फेम फहमान खान आणि श्वेता तिवारी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

श्वेता तिवारीबरोबर नाव जोडलं गेल्यानंतर फहमानने याबाबत भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने श्वेता तिवारीबरोबरच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. "मी तिला गुरू जी म्हणून हाक मारतो आणि ती मला सखी म्हणते. तिला जे वाटतं त्या नावाने ती मला हाक मारते. आमचं नातं खूप छान आहे. आमचं नातं काय आहे ते आम्हाला माहीत आहे. जर काही लपवण्यासारखं असतं तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असता. कारण, जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा लोकांना आपल्याबद्दल कळतंय का, ही चिंता तुम्हाला असते. पण, जर तसं काहीच नसेल. तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही", असं फहमान पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. 

"कोव्हिडमध्ये एका बिल्डिंगमध्ये आम्ही भेटलो होतो, त्यामुळे आम्ही डेट करत असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. याबाबत बोलायला आम्हाला काहीच वाटत नाही. यावर आम्हाला हसू येतं. तेव्हापासून मी ज्या अभिनेत्रींसोबत काम केलं. त्यांच्याबरोबर माझं नाव जोडलं गेलं", असंही फहमान म्हणाला. फहमान आणि श्वेताने  मेरे डॅड की दुल्हनमध्ये काम केलं आहे. 

श्वेताने १९९८ मध्ये राजा चौधरीशी लग्न करत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर २०१३ मध्ये तिने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती. पण, तिचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. २०१९ मध्ये अभिनव आणि श्वेताने घटस्फोट घेतला. 

Web Title: fahman khan break silence on dating shweta tiwari relationship rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.