Nach Baliye 9 : स्नेहा वाघने केला फैजल खानसोबतच्या रिलेशनशिपसोबत केला मोठा खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:26 IST2019-10-02T12:25:08+5:302019-10-02T12:26:43+5:30
'नच बलिये 9' मध्ये फैजल खान आणि मुस्कान कटारिया यांची जोडी झळकली होती. मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.

Nach Baliye 9 : स्नेहा वाघने केला फैजल खानसोबतच्या रिलेशनशिपसोबत केला मोठा खुलासा, म्हणाली...
'नच बलिये 9' मध्ये फैजल खान आणि मुस्कान कटारिया यांची जोडी झळकली होती. मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे ज्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. मुस्कानने फैजलवर विश्वासघात केल्याचा आरोप लावला होता. तर फैजलने मुस्कानने लावलेल्या सर्व आरोपांचं खंडन केले होते. तसेच मुस्कानने फैजलवर चंद्रगुप्त मौर्या मालिकेतील सहकलाकार स्नेहा वाघला डेट करत असल्याचा आरोप केला होता.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार अभिनेत्री स्नेहा वाघने याप्रकरणावर भाष्य केले आहे. स्नेहा म्हणाली, असे काहीच नाही आहे. माझ्या आयुष्यात मित्र असू शकत नाहीत का?, फैजल हा केवळ मात्र चांगला मित्र नसून फॅमिली फ्रेंडसुद्धा आहे. मी मुस्कानला नाही ओळखत. कुठे तरी मला असं वाटतंय हे सगळं पल्बिसिटी मिळवण्यासाठी करण्यात येतंय. अशा पद्धतीटे स्टंट करुन काही हाती लागत नाही शेवटी तुमचं हार्डवर्कचं कामाला येते. माझ्या आणि फैजलच्या मैत्रिचा त्याच आणि मुस्कानचं ब्रेकअप होण्याशी काहीच संबंध नाही.
याआधी फैजलने सुद्धा मुस्कानने लावले सर्व आरोप फेटाळले होते. तो म्हणाला होता की, मी हे ऐकून हैराण आहे की मुस्कानने माझ्यावर फसवणुकीचा आरोप लावला आहे. मी कधीच कोणाला धोका नाही दिला. मला झालेल्या दुखापतीमुळे आम्हाला शो सोडावा लागला यामुळे आरोप माझ्यावर हे सर्व लावण्यात येत आहेत.मुस्कानसोबत रिलेशनशीपमध्ये राहणं ही माझी आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक असल्याचे मला वाटतेय. यापुढे मी कोणालाही डेट करणार नाही आणि प्रेम करण्याची चूक आयुष्यात पुन्हा करणार नाही. मला वाटतंय मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो.