सीआयडी या मालिकेतील हा प्रसिद्ध अभिनेता अनेक वर्षं काम करायचा बँकेमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 07:59 AM2018-02-05T07:59:23+5:302018-02-05T13:30:11+5:30

सीआयडी ही मालिका गेली २० वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन, फॅड्रीक्स या व्यक्तिरेखा ...

This famous actor from the series CID will work for several years in the bank | सीआयडी या मालिकेतील हा प्रसिद्ध अभिनेता अनेक वर्षं काम करायचा बँकेमध्ये

सीआयडी या मालिकेतील हा प्रसिद्ध अभिनेता अनेक वर्षं काम करायचा बँकेमध्ये

googlenewsNext
आयडी ही मालिका गेली २० वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील दया, अभिजीत, एसीपी प्रद्युमन, फॅड्रीक्स या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत सुरुवातीपासूनच शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, आदित्य श्रीवास्तव काम करत असल्याने त्यांच्यासाठी सीआयडी या मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबासारखी बनली आहे. या मालिकेचे निर्माते बी. पी. सिंग आणि शिवाजी साटम हे तर अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. त्या दोघांनी एक शून्य शून्य या मालिकेत देखील एकत्र काम केले होते. त्यांच्या या मैत्रीमुळेच शिवाजी साटमच एसीपी प्रद्युमन या भूमिकेसाठी योग्य असल्याचे बी. पी. सिंग यांना वाटत होते आणि त्यामुळे त्यांना शिवाजी साटम यांना या मालिकेविषयी विचारले आणि त्यांनी देखील लगेचच या मालिकेत काम करण्यास होकार दिला.

shivaji satam


सीआयडी या मालिकेला आता जवळजवळ २० वर्षं झाले असले तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. एसीपी प्रद्युमन ही व्यक्तिरेखा, शिवाजी साटम यांची कुछ तो गडबड है असे म्हणण्याची स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तुम्हाला माहीत आहे का, सीआयडी या मालिकेत काम करत असताना शिवाजी साटम बँकेत नोकरी करत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये काम करत असतानाच ते अभिनयक्षेत्राकडे वळले. अनेक वर्षं मराठी नाटक, सिनेमे, मालिका यांच्यात काम करतच त्यांनी नोकरी केली. सीआयडी मालिकेत काम करत असताना देखील चित्रीकरण आणि नोकरी या दोन्ही गोष्टी ते ताळमेळ घालत होते. पण त्यांनी २००० मध्ये त्यांच्या नोकरीला रामराम ठोकला. याविषयी शिवाजी साटम सांगतात, मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वर्षं काम करत होतो. नोकरी सांभाळून मी अभिनयक्षेत्रात कार्यरत होतो. बँकेतील माझ्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी मला खूपच समजून घेतले. चित्रीकरणामुळे बँकेत जाणे शक्य नसल्यास मी एकदम सकाळी अथवा रात्री उशिरा बँकेत जाऊन माझी कामं पूर्ण करत असे. पण कधीच कोणीही या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. त्याचमुळे मी २००० पर्यंत नोकरी करू शकलो. पण नंतर माझी पत्नी खूप आजारी पडली. तिच्या आजारपणामुळे आणि मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला नोकरीला जाणे शक्य होतच नव्हते. सतत होत असलेल्या दांड्यामुळे मला बँकेकडून पत्र आले. आता आपल्याला नोकरी करणे जमणार नाही याची मला जाणीव झाल्याने मी राजीनामा दिला. 

Also Read : सीआयडीमधील या अभिनेत्रीसोबत होते दयानंद शेट्टीचे अफेअर, सिंगल मदर बनून आता करत आहे त्याच्या मुलीचा सांभाळ

Web Title: This famous actor from the series CID will work for several years in the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.