प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीचा देव, अध्यात्मावर विश्वास आहे का? दिलं हे उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 03:13 PM2024-02-06T15:13:14+5:302024-02-06T15:16:08+5:30
देवावर-अध्यात्मावर विश्वास आहे का? पाहा प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी जुई गडकरी काय सांगतेय
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीनं उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. ती सोशल मीडियावर चर्चेत असते. जुई 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जुईच्या इतर मालिकांप्रमाणेच ही मालिकादेखील प्रचंड यश मिळवताना दिसतेय. प्रेक्षक मालिकेला भरभरून प्रेम देत आहेत. अलिकडेच जुईने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिनं अध्यात्मावर भाष्य केलं.
अलिकडेच जुईने राजश्री मराठीच्या 'तिची गोष्ट' या सेगमेंटमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये तिनं आध्यात्मावर भाष्य केलं आहे. तुझी आध्यात्मिक बाजू खूप भक्कम आहे. तू दत्तजयंतीला कर्जतला जातेस. आजार आणि काम यामध्ये तुला तुझ्या आध्यात्मिक बाजूचा फायदा झाला का, असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली, 'जेव्हा आपलं काही चांगलं घडत नसतं. तेव्हा आपण म्हणतो की पत्रिकेमध्ये गुरूबळ कमी आहे. तेव्हा तुम्ही काय करु शकता. गुरुचे पाय धरा. त्याला शरण जा'.
पुढे ती म्हणाली, 'तुमच्या गुरूला सांगा मी तुझ्यासाठी हवं तेवढं करेन. माझं आयुष्य तुझ्या पायाशी टाकलं आहे. आता तू बघ. असं तुम्ही जेव्हा तुमच्या गुरुसमोर शरण जाता. तेव्हा गुरू त्याची काळजी घेतो आणि माझ्या बाततीत ते आहे. मी डोळे झाकून माझ्या देवाच्या पायाशी आहे. कुणीच नाही माझ्यासाठी उभा राहत. तो कायम उभा राहतो. मी जेव्हा अध्यात्माच्या मार्गावर आले. तेव्हापासून मी पुर्णपणे बदलले. माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्ट्रीकोन बदलला'.
जुई गडकरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे. शिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. तसेच जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.