'गोठ' मालिकेतील अभिनेत्री शलाका पवारचा नवरादेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 07:00 AM2021-11-12T07:00:00+5:302021-11-12T07:00:00+5:30

शलाका पवारने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.

Famous Marathi actor is also the husband of actress Shalaka Pawar from 'Goth' series | 'गोठ' मालिकेतील अभिनेत्री शलाका पवारचा नवरादेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता

'गोठ' मालिकेतील अभिनेत्री शलाका पवारचा नवरादेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता

googlenewsNext

मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री शलाका पवार म्हणजे पूर्वाश्रमीची शलाका देसाई . त्यांचे आजोबा तैलचित्रकार होते त्यामुळे त्यांच्या आजोबांना कलेची आवड होती. शलाकाचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले त्यामुळे मराठी कळत होती, बोलताही येत होती मात्र तिला वाचता येत नव्हती म्हणून त्यांच्या आजोबांनी तिला शिक्षक आणि नाट्य कलाकार असलेल्या रवी भाटवडेकर यांच्याशी ओळख करून दिली. त्यांच्यामार्फत शलाकाचा नाटकांमधून प्रवास सुरु झाला.

इरादा पक्का, मर्डर मेस्त्री, ऑल मोस्ट सुफळ संपूर्ण, गोठ, तू चांदणे शिंपित जाशी या चित्रपट आणि मालिकांमधून शलाका महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. ‘यदा कदाचित’ या गाजलेल्या विनोदी नाटकात शलाकाने द्रौपदीची भूमिका साकारली होती. २७ वर्षांपूर्वी यदा कदाचित हे नाटक अभिनेता संतोष पवारने मंचावर आणले आणि प्रेक्षकांकडून हे नाटक तुफान लोकप्रियता मिळाली. याच नाटकातून संतोष पवार आणि शलाका एकत्रित प्रेक्षकांसमोर आले आणि त्यांनी लग्नही केले.

आज त्यांच्या लग्नाला जवळपास २० वर्षे उलटली आहेत. हास्या हे त्यांच्या मुलीचे नाव तर केशा हे त्यांच्या मुलाचे नाव आहे. संतोष पवार हा मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गीतकार म्हणून प्रचलित आहे. शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून त्याने सुरुवातीला केदार शिंदे, अंकुश चौधरी, भरत जाधव यांच्यासोबत काम केले. इथूनच ही सर्व कलाकार मंडळी एकमेकांची साथ धरून मराठी प्रेक्षकांसमोर एका पेक्षा एक अफलातून कलाकृती घेऊन आले.

यदा कदाचित या नाटकाच्या लोकप्रियतेनंतर आम्ही सारे लेकुरवाळे, आलाय मोठा शहाणा, दिली सुपारी बायकोची, युगे युगे कलियुगे, स्वभावाला औषध नाही, दिनूच्या सासूबाई राधाबाई यासारखे नाटक लेखक, दिग्दर्शक तर कधी अभिनेता बनून प्रेक्षकांसमोर आणले. ऑन ड्युटी चोवीस तास या चित्रपटाच्या कथालेखनाचे काम त्याने केले होते. मी आणि शाहीर साबळे हा त्याने आणलेला रंगमंचावरील कार्यक्रम प्रेक्षकांनी आपलासा केला. या प्रवासात त्याने अनेक नवख्या कलाकरांना देखील अभिनयाची संधी मिळवून दिली. यदा कदाचित रिटर्न्स हे नाटक त्याने प्रेक्षकांच्या भेटीला आले. हे नाटक यदा कदाचित पेक्षा खूप वेगळे आहे. या नाटकातून शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम त्याने केले.

Web Title: Famous Marathi actor is also the husband of actress Shalaka Pawar from 'Goth' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.