'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांची खरी सूनदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:00 AM2021-06-03T08:00:00+5:302021-06-03T08:00:00+5:30

'आई कुठे काय करते'मध्ये अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी साकारलेल्या कांचनच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.

Famous Marathi actress is also the real daughter-in-law of Aai Kuthe Kay Karte fame Kanchan Deshmukh | 'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांची खरी सूनदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

'आई कुठे काय करते'मधील कांचन देशमुख यांची खरी सूनदेखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील आप्पा, कांचन, अनिरूद्ध, अरूंधती, इशा, अभिषेक, यश, गौरी आणि संजना या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतात. या मालिकेत कांचन देशमुखची भूमिका साकारून अभिनेत्री अर्चना पाटकर घराघरात पोहचल्या आहेत. फार कमी लोकांना माहित असेल की त्यांची सूनदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. 

अभिनेत्री अर्चना पाटकर यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटविली आहे.. आत्मविश्वास, सून लाडकी सासरची, इना मीना डिका यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. तर आभास हा या मालिकेतही त्यांनी काम केले आहे. सुरुवातीला सहकलाकार म्हणून भूमिका गाजवून त्यांनी सून लाडकी सासरची चित्रपटात सासूची भूमिका केली. 


 अर्चना पाटकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हमरमळा हे त्यांचे सासर. महेंद्र पाटकर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. अर्चना पाटकर यांची सूनदेखील मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अर्चना पाटकर यांचा मुलगा आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली भूमिका बजावतो आहे. तो हिंदी मालिकेसाठी काम करतो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव ही त्याला आहे. 


आदित्यने अभिनेत्री हेमलता बाणे सोबत लग्न केले आहे. अभिनेत्री हेमलता बाणेला लहानपणापासून नृत्याची विशेष आवड असल्याने इयत्ता सातवीत असतानाच ‘मस्ताना’ हा स्टेज शो केला. इथूनच पुढे ४०० हुन अधिक अल्बम मधून काम केले. त्यातील रेतीवाला नवरा पाहिजे या अल्बमला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. 


आम्ही सातपुते, इवलासा खोपा,नवरा माझा भवरा, चल धर पकड, कॅरी ऑन देशपांडे, मोहर, सत्य सावित्री आणि सत्यवान, लावू का लाथ, चिरगुट, साहेब यासारख्या चित्रपटातून ती पहायला मिळाली.

तसेच मानाचा मुजरा, झुंज मराठमोळी यासारख्या शोमध्येही तिने सहभाग दर्शवून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. एकेकाळी आघाडीवर असणारी हेमलता आता अभिनय क्षेत्रात फारशी सक्रीय नाही. आता तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. 

Web Title: Famous Marathi actress is also the real daughter-in-law of Aai Kuthe Kay Karte fame Kanchan Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.