प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जखमी, ६ टाके अन् हाताची झाली सर्जरी, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 13:32 IST2023-04-30T13:29:18+5:302023-04-30T13:32:55+5:30
आरती सिंह आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जखमी, ६ टाके अन् हाताची झाली सर्जरी, Video व्हायरल
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंह(Arti Singh) बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरती सिंह जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या हाताची सर्जरी झाली आहे. 23 एप्रिल 2023 रोजी ही दुर्घटना झाली.
आरती सिंह आपल्या मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेली होती. त्यावेळी चुकून तिच्या हातातून ग्लास फुटला. तिच्या हातात काचा घुसल्या. यामुळे तिच्या हातावर सर्जरी करावी लागली. आरती सिंहने माध्यमांना माहिती देताना सांगितले,"२३ एप्रिलला मित्रांसोबत जेवायला गेले होते. तिथे माझ्याकडून ग्लास तुटला आणि मला कळले की ग्लासचे तुकडे माझ्या हातात घुसले. पूर्ण रात्र मला वेदना होत होत्या सकाळी उठल्यानंतर मी लगेच डॉक्टरकडे गेले. कारण मला वेदना असह्य झाल्या होत्या. चेकअपनंतर लक्षात आलं की हातात ७ काचेचे तुकडे गेले आहेत. त्यांनी काचेचे तुकडे काढले आणि ६ टाके टाकले."
आरतीने शेअर केला व्हिडिओ
आरतीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती रुग्णालयातील बेडवर झोपून आपल्या शोची लॉंचिंग बघत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले,'हा आठवडा कठीण गेला. सर्जरी झाली. काचेचा ग्लास हातात तुटून काचा हातात गेल्या. माझ्या शोची लॉंचिंग मी रुग्णालयातून पाहिली. बरं झालं फार काही गंभीर झालं नाही. मला फक्त हे माहिती आहे की गुरुजींनी मला वाचवलं आणि माझी काळजी घेतली. आयुष्य चढउताराने भरलं आहे.काम सुरु आणि रुग्णालयात दाखल झाले पण मी वाघीण आहे.चेहऱ्यावर हास्य ठेवत मजबूतीने परत येईल."
सध्या आरती सिंहला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तिने आपला टीव्ही शो 'श्रवनी' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यामध्ये ती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.