​बिग बॉसमधील या प्रसिद्ध कपलने गेले गुपचूप लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 10:05 AM2018-03-05T10:05:58+5:302018-03-05T15:35:58+5:30

बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये गाजलेली जोडी रोशेल राव आणि किथ सिक्वेरा नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. किथ सिक्वेरा आणि ...

This famous wedding in Bigg Boss was secretly married | ​बिग बॉसमधील या प्रसिद्ध कपलने गेले गुपचूप लग्न

​बिग बॉसमधील या प्रसिद्ध कपलने गेले गुपचूप लग्न

googlenewsNext
ग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये गाजलेली जोडी रोशेल राव आणि किथ सिक्वेरा नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. किथ सिक्वेरा आणि रोचेल राव हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध कपल मानले जाते. ते दोघे बिग बॉमध्ये झळकले होते. त्यावेळी त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. किथ आणि रोचेल अनेक वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांनी कधीच आपले नाते मीडियापासून लपवून ठेवले नाही. त्यांनी गेल्या वर्षी व्हेलेंटाईन डेला गुपचूप साखरपुडा केला होता आणि आता त्या दोघांनी लग्न केले आहे. कीथ आणि रोशेलने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या फोटोत किथने आकाशी रंगाचा कोट घातला आहे तर रोशेल पांढऱ्या गाऊनमध्ये आहे. ते दोघेही या फोटोत खूपच छान दिसत आहेत. 

keith sequeira and rochelle rao


किथ सिक्वेराने बिग बॉस, सुपर फाइट लीग या रिअॅलिटी शोमध्ये काम केले होते. तसेच लव्ह का है इंतजार या मालिकेत तो झळकला होता. रोशेल राव २०१२ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल किताबाची मानकरी ठरली होती. याशिवाय झलक दिखला जा, खतरों के खिलाडी मध्येही ती सहभागी झाली होती. किथने साखरपुड्याच्यावेळी चाहत्यांना सांगितले होते की, रोचेलला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी कशाप्रकारे प्रपोज करायचे हे कित्येक दिवसांपासून माझ्या डोक्यात सुरू होते. रोचेलला मला अंदमानला नेऊन समुद्रकिनारी अथवा एखाद्या पर्वतावर नेऊन निर्सगाच्या सान्निध्यात प्रपोज करायचे होते. पण आमच्या दोघांच्या कामाच्या व्यग्र शेड्युलमळे आम्हाला कुठे बाहेर जाता आले नाही. त्यामुळे मी तिला घरातच प्रपोज केले. ती माझ्या घरी आली असता तू माझ्याशी लग्न करशील का हा प्रश्न मी तिला रॉमेंटिक अंदाजात विचारला. तिनेदेखील क्षणात माझे प्रपोजल स्वीकारले. तो क्षण आमच्या दोघांसाठी खूपच खास होता. मी रोचेलच्या हातात अंगठी घातली. आम्ही अतिशय साधेपणाने साखरपुडा केला."
रोशेल राव आणि किथ सिक्वेराच्या लग्नामुळे त्यांच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाला आहे. 

Also Read : लव्ह का है इंतजार फेम किथ सिक्वेरा आणि संजीदा शेख अडकले लिफ्टमध्ये
 

Web Title: This famous wedding in Bigg Boss was secretly married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.